
Bihar Election2025 | बिहार विधानसभा निवडणुकीतील मतमोजणी सुरू आहे. सध्याच्या कलांवरून असे दिसून येते की एनडीएने आपली आघाडी कायम ठेवली आहे. दरम्यान, महाआघाडी ५० पर्यंतही पोहोचू शकली नाही. याचा अर्थ एनडीएला मोठा विजय मिळण्याची शक्यता आहे. यामुळे आरजेडी आणि काँग्रेसच्या महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे राघोपुरमध्ये तेजस्वी यादव आणि भाजपचे सतीश कुमार यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
या जागेवर तेजस्वी यादव आधी मागे पडले होते आणि भाजपचे सतीश कुमार यांनी आघाडी घेतली होती. पण आठव्या फेरीत तेजस्वी यादव यांनी किरकोळ फरकाने (२८६ मतांनी) आघाडी घेतली. त्यानंतर नवव्या फेरीत तेजस्वींना चांगली आघाडी मिळाली आणि ते ४५८५ मतांनी पुढे निघाले. पण दहाव्या फेरीत तेजस्वींची आघाडी कमी झाली आणि आता ते फक्त ७७२ मतांनी पुढे आहेत.
&
काउंटिंग बहुत ज़्यादा ही धीमी है।
काउंटिंग रात के 2 बजे रात तक ले जाने की तैयारी है। डटे रहना है मेरे भाइयों,साथियों!
हम पीछे हटने वाले लोग नहीं
— Tejashwi Yadav (@TejashwiYdvRJD) November 14, 2025
मागे हटणारे लोक नाही – तेजस्वी यादव
तर नुकतेच तेजस्वी यादव यांनी ट्वीट करत तेजस्वी यादव यांनी, “मतमोजणी अतिशय हळू चालू आहे. मोजणी रात्री २ वाजेपर्यंत नेण्याची तयारी आहे. ठाम राहायचं आहे माझ्या भावांनो, साथिदारांनो! आम्ही मागे हटणारे लोक नाहीत,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, राघोपुर जागा यामुळेच चर्चेत आहे कारण या जागेवर २०१० साली सतीश कुमार जेडीयूचे उमेदवार होते. यावेळी त्यांनी राबडी देवींना याच जागेवरून निवडणूकीत हरवले होते. याआधी २०१५ आणि २०२० मध्ये तेजस्वी यादव यांनी सतीश कुमार यांना हरवले होते. यावेळी सतीश कुमार भाजपकडून निवडणूक लढत आहेत.
The post राघोपुरमध्ये ‘काटे की टक्कर’; तेजस्वी यादव यांनी डाव पलटला अन् पुन्हा घेतली आघाडी appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











