वामिकाचा पब्लिसिटी स्टंट? रिक्षात बसली अन्….; व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, नेमकं काय घडलं?

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Wamika Gabbi : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत बॅालिवूड अभिनेत्री वामिका गब्बी ऑटो रिक्षात बसलेली दिसत आहे. या व्हिडीओत अभिनेत्री तिचा चेहरा डोक्यावर असणाऱ्या टोपीने लपवताना दिसत आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

अभिनेत्री वामिका गब्बी ही सध्याची बॅालिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जात आहे. ती अनेक हिंदी सिनेमांसह वेबसिरीजमध्येही दिसत असून तिच्या मोजक्याच पण लक्षात राहणाऱ्या भूमिका वामिका निभावताना दिसत आहे. सोशल मीडियावर देखील तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

अभिनेत्री वामिका गब्बी तिच्या चित्रपटांच्या प्रमोशन दरम्यान पापाराझींसाठी पोझ देताना दिसते. पण व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत मात्र ती स्वतः चेहरा लपवताना दिसली. एका अॅटो रिक्षात एक तरुण तिच्या शेजारी बसलेला दिसत आहे. पण तो तरुण कोण आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, वामिका पापाराझींपासून तिचा चेहरा लपवताना दिसली. तिने तिची टोपी तिच्या चेहऱ्यावर ओढली आणि त्यांना एकही फोटो काढू दिला नाही. यामुळे वेगवेगळ्या चर्चा झडू लागल्या आहेत.

सोशल मीडियावर वापरकर्त्यांनीही वामिका गब्बीच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या असून काहींनी अभिनेत्री मेकअप करत नसल्याचे म्हटले आहे, तर काहींनी याला पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी म्हटले आहे की, पापाराझींनी अभिनेत्रीला अशा प्रकारे फॉलो करू नये. जेव्हा ती तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करत नसेल तेव्हा त्यांनी तिला एकटे सोडले पाहिजे.

वामिका गब्बी राजकुमार रावसोबत भूल चुक माफ चित्रपटात दिसली. पुढच्या वर्षी ती डीसी या दक्षिण भारतीय चित्रपटात दिसणार आहे. ती पती, पत्नी और वो २ आणि भूत बांगला या चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे. थोडक्यात पुढील वर्षी तिचे अनेक मोठे चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहेत.

हेही वाचा : देशाला आणखी चार नवीन वंदे भारत ट्रेनची भेट; पंतप्रधान मोदींना दाखवला हिरवा झेंडा

The post वामिकाचा पब्लिसिटी स्टंट? रिक्षात बसली अन्….; व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!