
Giriraj Singh। बिहार विधानसभा निवडणुकीतील सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये एनडीए युती महाआघाडीवर लक्षणीय आघाडी घेत असल्याचे दिसून आले आहे. पूर्वीच्या एक्झिट पोलमध्येही एनडीए पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान , समोर येत असलेल्या कालांवर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येणयास सुरुवात झाली आहे. त्यात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी देखील एनडीएच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत आणखी एका राज्यासाठी इशारा दिला आहे.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या कलांवर प्रतिक्रिया देताना,”भाजप बिहारमध्ये पुनरागमन करत आहे आणि पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करण्याच्या रांगेत आहे.” असे म्हटले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान, गिरीराज सिंह यांनी एका हिंदीला बोलताना म्हटले,”बिहार आमचा विजय आहे, आता बंगालची पाळी आहे.” Giriraj Singh।
ते पुढे म्हणाले, “आम्ही बंगालमध्येही विजय मिळवू, कारण तिथे अराजकतेचे सरकार आहे. तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगाकडून प्रमाणपत्र न घेता १८ तारीख निश्चित केली. त्यांना रांची आणि आग्रा येथून परतलेले मानले जाईल.” त्यांची प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे जेव्हा बिहार निवडणुकीत एनडीए मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहे. Giriraj Singh।
The post “बिहारचा विजय आमचा, आता पुढचा नंबर बंगालचा…” ; केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी दिला इशारा appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











