बिहारमध्ये बहुमतचा जादूई आकडा किती? एनडीएने अखेर पार केला…

Bihar Elections 2025 |
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Bihar Elections 2025 |  बिहारमध्ये मतमोजणी सुरू झाली आहे आणि सुरुवातीचे कल एनडीएच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएने बहुमताचा आकडा पार केल्याचे समोर आले आहे. सध्या २०४ जागांचे कल हातात आले आहेत. ते १३५ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, महाआघाडी ६५ जागांवर आघाडीवर आहे.

यात आरजेडी ५७ जागांवर आघाडीवर असून भाजप ५८ जागांवर आघाडीवर आहे. यात भाजप आणि आरजेडीमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

आतापर्यंतच्या सुरुवातीच्या कलांबद्दल बोलायचे झाल्यास, एनडीएने बहुमतासाठी लागणारा १२२ जादुई आकडा पार करून १२२ पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. सध्या मतमोजणी सुरू असून एनडीएला आणखी जास्त जागांवर आघाडी मिळू शकते.

सध्याच्या सुरुवातीच्या कलांनुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएला मोठा विजय मिळताना दिसत आहे आणि महाआघाडी मागे पडताना दिसत आहे. बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा १२२ आहे. Bihar Elections 2025 |

The post बिहारमध्ये बहुमतचा जादूई आकडा किती? एनडीएने अखेर पार केला… appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!