
प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात शासनाने दुसऱ्यांदा बदल केला आहे. आता १४ नोव्हेंबरऐवजी २० नोव्हेंबरला यादी जाहीर होणार आहे. शासनाकडून या पूर्वी ६ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली होती. त्यानंतर या वेळापत्रकात बदल करत उद्या (शुक्रवारी) ती जाहीर केली जाणार होती. मात्र, त्यापूर्वीच शासनाकडून नवीन वेळापत्रक महापालिकेस पाठविण्यात आले आहे.
राज्यातील काही महापालिकांच्या यादीचे काम अद्याप अपूर्ण असल्याने त्यांच्याकडून सातत्याने मुदतवाढ मागण्यात येत आहे. त्यामुळे आयोगाने आता सर्वच महापालिकांना मुदतवाढ देण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, यात केवळ यादी जाहीर करणे आणि हरकती सूचनांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला अंतिम मतदार याची प्रसिद्ध करण्याची तारीख १२ डिसेंबरच ठेवण्यात आली.
असे आहे सुधारीत वेळापत्रक
– प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी :२० नोव्हेंबर २०२५
– हरकती व सूचना दाखल अंतिम तारीख : २७ नोव्हेंबर २०२५
– हरकतींचा विचार करून अंतिम यादी प्रसिद्ध करणे : ५ डिसेंबर २०२५
– मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदार यादी जाहीर करणे : ८ डिसेंबर २०२५
– मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे : १२ डिसेंबर २०२५
The post प्रारूप मतदार यादी पुन्हा लांबणीवर! महापालिका निवडणुकीची मतदार यादी आता ‘या’ दिवशी होणार जाहीर appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











