देशाला आणखी चार नवीन वंदे भारत ट्रेनची भेट; पंतप्रधान मोदींना दाखवला हिरवा झेंडा

PM Modi Varanasi Visit |
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

PM Modi Varanasi Visit |  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी 4 नव्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन झाले आहे. मोदी यांनी हिरवी झेंडा दाखवून ही ट्रेन वाराणसी रेल्वे स्थानकातून रवाना केली. स्थानकावर या प्रसंगी प्रवाशांमध्ये प्रचंड उत्साह होता. पंतप्रधान मोदी यांनी बनारस ते खजुराहो वंदे भारत, फिरोजपूर-दिल्ली वंदे भारत, लखनऊ-सहारापूर वंदे भारत आणि एर्नाकुलम-बेंगळुरू वंदे भारत अशा चार ट्रेनना वाराणसीतून हिरवा झेंडा दाखवला. या चार नवीन वंदे भारत ट्रेनसह देशात आता १६० हून अधिक नवीन वंदे भारत सेवा कार्यरत आहेत.

“एखाद्या शहराला चांगली कनेक्टिव्हिटी मिळाली की, त्याचा विकास आपोआपच वेगवान होतो. पायाभूत सुविधा केवळ मोठे पूल आणि महामार्गांपुरत्या मर्यादित नाहीत. वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारत सारख्या ट्रेन भारतीय रेल्वेच्या पुढील पिढीसाठी पाया रचत आहेत. ही भारतीय रेल्वेचे रूपांतरण करण्यासाठी एक संपूर्ण मोहीम आहे. वंदे भारत ही भारतीयांची, भारतीयांनी आणि भारतीयांसाठी बांधलेली ट्रेन आहे. प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान आहे, असे पंतप्रधान मोदी नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे लोकार्पण सोहळ्यात वाराणसीतून बोलत होते.

पुढे ते म्हणाले, “जगभरातील विकसित देशांमध्ये पायाभूत सुविधा आर्थिक विकासाचा एक प्रमुख चालक ठरल्या आहेत. ज्या देशांमध्ये लक्षणीय प्रगती आणि विकास झाला आहे, त्यांच्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास एक महत्त्वाचा घटक ठरला आहे. भारत देशही या मार्गावर वेगाने प्रगती करत आहे. या अनुषंगाने, देशाच्या विविध भागांमध्ये नवीन वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जात आहेत.”

“विकसित भारतासाठी भारताने आपली संसाधने सुधारण्यासाठी मोहीम सुरू केली आहे, त्यामुळे या गाड्या त्यात एक मैलाचा दगड ठरणार आहेत. देशात चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारत अशा ट्रेना भारतीय रेल्वेच्या पुढच्या पिढीची पायाभरणी करत आहेत. ह्या केवळ रेल्वे प्रकल्प नाहीत, तर भारतीय रेल्वेला रूपांतरित करण्याचा एक राष्ट्रीय मोहीम आहेत.” PM Modi Varanasi Visit |

कोणत्या आहेत ट्रेन्स

बनारस-खजुराहो वंदे भारत एक्सप्रेस, लखनऊ-सहारनपूर वंदे भारत एक्सप्रेस, फिरोजपूर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, एर्नाकुलम-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस

  • बनारस-खजुराहो वंदे भारत एक्सप्रेस भारतातील काही अत्यंत प्रसिद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना जोडेल. त्यामध्ये वाराणसी, प्रयागराज, चित्रकूट आणि खजुराहो यांचा समावेश आहे. तर लखनौ-सहारनपूर वंदे भारत एक्सप्रेस सुमारे 7 तास 45 मिनिटांत प्रवास पूर्ण करेल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ जवळजवळ 1 तास वाचेल.
  • लखनौ-सहारनपूर वंदे भारत एक्सप्रेसमुळे लखनौ, सीतापूर, शाहजहांपूर, बरेली, मुरादाबाद, बिजनौर आणि सहारनपूर येथील प्रवाशांना खूप फायदा होईल, तसेच रुरकीमार्गे पवित्र हरिद्वार शहरापर्यंत पोहोचण्यासही मदत होईल.
  • फिरोजपूर-दिल्ली वंदे भारत ही या मार्गावरील सर्वात जलद गाडी असेल, जी फक्त 6 तास 40 मिनिटांत प्रवास पूर्ण करेल.
  • फिरोजपूर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस राष्ट्रीय राजधानी आणि पंजाबमधील फिरोजपूर, भटिंडा आणि पटियाला यासारख्या प्रमुख शहरांमधील संपर्क मजबूत करेल.
  • एर्नाकुलम-बेंगळुरू वंदे भारत गाडी प्रवासाचा 2 तासांपेक्षा जास्त वेळ कमी करत, प्रवास 8 तास 40 मिनिटांत पूर्ण करेल. एर्नाकुलम-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस प्रमुख आयटी आणि व्यावसायिक केंद्रांना जोडेल, ज्यामुळे व्यावसायिक, विद्यार्थी आणि पर्यटकांना जलद आणि अधिक आरामदायी प्रवास पर्याय उपलब्ध होईल. PM Modi Varanasi Visit |

हेही वाचा : 

स्थानिक निवडणुकीसाठी राजकीय खेळी? चंद्रकांत पाटलांनी मोजक्याच शब्दांत स्पष्टचं सांगितलं म्हणाले…

The post देशाला आणखी चार नवीन वंदे भारत ट्रेनची भेट; पंतप्रधान मोदींना दाखवला हिरवा झेंडा appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!