मधुमेह, हृदय विकारसारखे आजार असल्यास अमेरिकेत नो एन्ट्री; डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम

US Visa New Rules |
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

US Visa New Rules |  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने एकामागे एक आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये ट्रम्प यांनी विविध देशावंर टॅरिफ लादणे, H-1B व्हिसाचं शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला. यात आता आणखी एका नव्या निर्णयाचा समावेश करण्यात आला आहे. अमेरिकेत स्थलांतरित होऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांना आता मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयरोग ह्रदय विकार या सारख्या दीर्घकालीन आजारांमुळे व्हिसा आणि ग्रीन कार्ड नाकारले जाऊ शकते.

सीबीएस न्यूजच्या रिपोर्टनुसार, मार्गदर्शक सूचना उच्चायूक्त कार्यालयांना आणि अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या असून व्हिसा अधिकाऱ्यांनी व्हिसा अर्ज मंजूर करताना अर्जदाराच्या आरोग्याचा विचार करावा, असंही सांगण्यात आलं आहे.

परराष्ट्र विभागाने व्हिसा अधिकाऱ्यांना पाठवलेल्या एका पत्रात, ज्यांच्या आजारपणावरील उपचारांसाठी लाखो डॉलर्सचा खर्च होऊ शकतो, अशा अर्जदारांची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. नमूद केलेल्या आजारांच्या यादीमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार, श्वसन आजार, कर्करोग, मधुमेह, चयापचय आजार, न्यूरोलॉजिकल आजार आणि मानसिक आजार यांचा समावेश आहे.

या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये अधिकाऱ्यांना विशेषतः लठ्ठपणासारख्या परिस्थितींचा विचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण लठ्ठपणामुळे दमा, स्लीप एपनिया आणि उच्च रक्तदाब यासारखे आजार होऊ शकतात ज्याच्या उपचारासाठी मोठा खर्च येतो. US Visa New Rules |

अर्जदाराच्या आरोग्याचा खर्च आणि वैद्यकीय धोका लक्षात घेता…  

रिपोर्टनुसार, व्हिसा अधिकाऱ्यांना अर्जदार स्वत: वैद्यकीय उपचार घेऊ शकतात याची विचारणा करण्यास सांगण्यात आलं आहे. याशिवाय अर्जदारावर अवलंबून असणारी त्यांची मुलं आणि त्यांचे पालक यांच्या आरोग्याची माहिती देखील घ्यावी असं सांगण्यात आलं आहे. व्हिसाच्या अर्जदारांची आरोग्य तपासणी करण्यात येते, मात्र तज्ज्ञांच्या मते त्याची कक्षा वाढवण्यात येत आहे. अर्जदाराच्या आरोग्याचा खर्च आणि वैद्यकीय धोका लक्षात घेता अर्ज नामंजूर करण्यास कॉन्सुलर अधिकारी सर्वोच्च अथॉरिटी असेल. US Visa New Rules |

नव्या निर्देशांतर्गत व्हिसा अधिकाऱ्यांना स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की, त्यांनी अर्जदारांकडे सरकारी मदतीशिवाय त्यांच्या संपूर्ण अपेक्षित आयुष्यभर अशा दीर्घकालीन वैद्यकीय सेवेचा खर्च भागवण्यासाठी आर्थिक संसाधने आहेत का, याची चौकशी करावी.

या पावलामुळे आरोग्य संबंधी कमकुवत असलेल्या अर्जदारांना अमेरिकेत व्हिसा मिळण्याची शक्यता कमी होईल आणि हे धोरण अमेरिकेत सार्वजनिक आरोग्य खर्च नियंत्रित करण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आले आहे. या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे परदेशी लोकांना व्हिसा अर्ज करण्यापूर्वी त्यांच्या आरोग्य स्थिती आणि आर्थिक संसाधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक होईल.

हेही वाचा: 

रूपाली Vs रूपाली! चाकणकरांवरील टीका पडली महागात; पक्षाकडून ठोंबरेंवर शिस्तभंग नोटीशीचा बडगा

The post मधुमेह, हृदय विकारसारखे आजार असल्यास अमेरिकेत नो एन्ट्री; डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!