
पवनानगर – जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आज, दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक भेट दिली. त्यांच्या या खासगी दौऱ्यातील अल्पशा थांब्यामुळे लोहगड परिसरातील ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांसाठी आजचा दिवस अविस्मरणीय ठरला.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे लोहगड ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे आणि मनापासून स्वागत केले. या भेटीदरम्यान त्यांनी लोहगड परिसराचा समृद्ध इतिहास, पर्यटनदृष्ट्या असलेले महत्त्व आणि परिसराच्या विकासासाठी स्थानिकांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, याची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी, लोहगड-विसापूर विकास मंचाच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. मंचाचे उपक्रम आणि स्थानिक पातळीवर विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न याबद्दलची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.
’शिवसृष्टी’ प्रकल्पाची आशा
मंचाच्या कार्यकर्त्यांसाठी ही भेट एक सुवर्णक्षण ठरली. त्यांनी आपला विकासाचा दृष्टिकोन मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला. भविष्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा वेळ दिल्यास, लोहगड पायथ्याशी भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्याच्या महत्त्वपूर्ण योजनेवर त्यांच्याशी सखोल चर्चा करण्यात येईल, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या या अचानक भेटीने लोहगड परिसरातील ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या भेटीमुळे लोहगड परिसरात विकासाच्या नव्या शक्यता खुल्या होतील, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
The post मुख्यमंत्री फडणवीस यांची लोहगडाला ‘अचानक’ भेट; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











