धर्मेंद्र यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; तब्येतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट

Dharmendra Health Update |
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Dharmendra Health Update | ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. याचदरम्यान त्यांच्या निधनाच्या अफवा पसरल्याने त्यांच्या कुटुंबाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यानंतर धर्मेंद्र यांच्या तब्येतीची अपडेट समोर आली आहे.

धर्मेंद्र यांना आज सकाळी 7:30 वाजता ब्रिज कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यासोबत रुग्णवाहिकेत बॉबी देओल उपस्थित आहे. त्यांच्यावर आता उपचार घरीच सुरू राहतील, अशी माहिती ब्रिज कँडी रुग्णालयाचे डॉक्टर प्रतीत समाधानी यांनी दिली आहे.

‘माध्यम आणि इतर लोकांनी कोणतेही तर्क लावू नका, अशी विनंती’

धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा अभिनेता सनी देओलच्या टीमने अधिकृत स्टेटमेंट दिले आहे. यात नमूद करण्यात आले की, “मिस्टर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे आणि त्यांच्यावर घरीच उपचार केले जाणार आहेत. माध्यम आणि इतर लोकांनी कोणतेही तर्क लावू नका अशी आम्ही विनंती करत आहोत. धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबियांना यावेळी प्रायव्हसी द्यावी ही विनंती. धर्मेंद्र हे यापुढेही स्वस्थ राहावे, त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी चाहत्यांनी प्रार्थना करा, प्रेम आणि शुभेच्छा. कृपया त्यांच्याप्रती आदर ठेवा कारण त्यांचं चाहत्यांवर खूप प्रेम आहे.” Dharmendra Health Update |

दरम्यान, मागील काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. यापूर्वी सनी देओलच्या टीमनं धर्मेंद्र बरे होत असल्याचं आणि उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं सांगितलं होतं. परंतु त्यानंतर सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या अफवा वेगानं पसरल्या. मात्र त्यांची मुलगी ईशा देओल आणि पत्नी हेमा मालिनी यांनी यासर्व अफवांचं खंडन केलं. त्यानंतर आता धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. Dharmendra Health Update |

हेही वाचा : 

ट्रम्प यांचा मोठा खुलासा ; अमेरिकन विद्यापीठांना इशारा देत म्हणाले,”परदेशी विद्यार्थ्यांना रोखल्यास…”

 

The post धर्मेंद्र यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; तब्येतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!