शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं? आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

Shiv Sena Symbol |
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Shiv Sena Symbol |  केंद्रीय निवडणूक आयोगाने 2022 मध्ये एकनाथ शिंदे गटाला मूळ पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला ठाकरे गटाने आव्हान दिले. त्यानंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं? या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे.

यासंदर्भातील मूळ याचिका आणि अंतरिम अर्जावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांचे खंडपीठ अंतिम युक्तीवाद ऐकून घेणार आहेत. त्यामुळे या सुनावणीत काय निकाल लागणार? याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार? यासाठी या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

The post शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं? आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी appeared first on Dainik Prabhat.

Source

Join Our WhatsApp Group!