बिहारमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान का झाले? प्रशांत किशोर यांनी सांगितली दोन महत्त्वाची कारणे

Prashant Kishor |
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Prashant Kishor |  बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे. यंदा येथे झालेल्या विक्रमी मतदानाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांतील १२१ जागांवर ६४.६६ टक्के मतदान झाले. हे १९५१ नंतरचे सर्वाधिक मतदान आहे. तर २०२० च्या विधानसभा निवडणुकीत ५७.२९ टक्के मतदान झाले होते. यानंतर आता निवडणूक रणनीतीकार आणि जन सूरज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी विक्रमी मतदान होण्यामागचे कारण सांगितले आहे.

प्रशांत किशोर यांची जन सुराज पार्टी या निवडणुकीत पहिल्यांदाच मैदानात उतरली आहे. त्यांनी याला बदलाचा स्पष्ट संकेत म्हटले आणि यामुळे त्यांच्या पक्षाला फायदा होईल अशी आशा व्यक्त केली. प्रशांत किशोर यांच्या मते, यामागचे पहिले कारण म्हणजे लोकांना बदल हवा आहे आणि दुसरे कारण म्हणजे निवडणुकीत बिहारमधील स्थलांतरित कामगारांनी निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. हे स्थलांतरित कामगार सणासुदीच्या काळात घरी परतले होते आणि ते काही दिवस तेथेच थांबले.

बिहारमध्ये ६० टक्क्यांहून अधिक लोक बदल हवा 

प्रशांत किशोर यांनी दावा केला की,  जास्त मतदान प्रतिशत दोन गोष्टी दर्शवते- पहिली की बिहारमध्ये ६० टक्क्यांहून अधिक लोक बदल हवा असल्याचे दिसते. त्यांनी सांगितले की गेल्या २५-३० वर्षांपासून लोकांमध्ये एक उदासीनता होती कारण त्यांना खरा पर्याय दिसत नव्हता. यातच आता जन सुराजच्या येण्याने लोकांना एक नवा पर्याय मिळाला आहे आणि हे वाढलेले मतदान लोकांमध्ये नव्या पर्यायाकडे पाहण्याच्या उत्साहाचे दर्शन घडवते.

स्थलांतरित कामगार निवडणुकीत एक्स-फॅक्टर ठरला

प्रशांत किशोर किशोर घरी परतलेल्या स्थलांतरित कामगारांबद्दलही म्हणाले की, “छठ नंतर, मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगार येथेच थांबले. त्यांनी स्वतः मतदान केले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्र ही मतदान करतील हे सुनिश्चित केले. यामुळे सर्वांना आश्चर्य वाटत आहे. जे लोक असा विचार करत होते की महिला फक्त १०००० रुपयांची आर्थिक मदत मिळाल्याने निवडणुकीच्या निर्णय ठरवतील, ते चुकीचे ठरले आहेत. महिला महत्त्वाच्या आहेत, परंतु त्यांच्याही पलीकडे स्थलांतरित कामगार या निवडणुकीत एक्स-फॅक्टर आहेत.” Prashant Kishor |

पुढे किशोर यांनी ठामपणे सांगितले की, “कोणत्याही राजकीय तज्ज्ञाने, पक्षाने किंवा नेत्याने मतदानात अशी अनपेक्षित वाढ होईल अशी भविष्यवाणी केली नव्हती. पहिल्यांदाच तरुणांनी सर्वाधिक संख्येने मतदान केले आहे. तरुणांनी बिहारमध्ये बदल आणि सुधारणेसाठी मतदान केले आहे.”  Prashant Kishor |

हेही वाचा: 

Satara News : पालिकेची मतमोजणी वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ; निवडणूक निर्णय अधिकारी बारकुल यांची माहिती

The post बिहारमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान का झाले? प्रशांत किशोर यांनी सांगितली दोन महत्त्वाची कारणे appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!