पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक: प्रभागांचे चित्र स्पष्ट

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०२६ मध्ये होणार आहे. त्यासाठी आरक्षण सोडत प्रक्रिया मंगळवारी (दि. ११) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे संपन्न झाली.

राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने या आरक्षण सोडतीच्या कामासाठी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नियंत्रणाखाली आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण झाली.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, यांच्यासह महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह आयुक्त मनोज लोणकर, सहायक नगर रचनाकार प्रशांत शिंपी, नगरसचिव मुकेश कोळप, सह शहर अभियंता अनिल भालसाकळे, बापू गायकवाड, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, निवडणूक विभाग उपायुक्त सचिन पवार, अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेले महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

चार टप्‍प्‍यात संपन्‍न झाली प्रक्रिया

निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सुरूवातीला राज्य निवडणूक आयोगाची आरक्षण सोडतीसाठी असणारी नियमावली सांगितली. त्यानंतर निवडणूक आरक्षण सोडत प्रक्रिया चार टप्प्यात संपन्न झाली. सुरूवातीला अनुसुचित जातीसाठी ज्या प्रभागातील अनुसुचित जातीच्या लोकसंख्येची टक्केवारी त्या प्रभागातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक असेल अशा प्रभागापासून सुरूवात करून उतरत्या क्रमाने त्याची मांडणी करण्यात आली.

त्यानुसार, ३२ प्रभागांपैकी २० प्रभागांमध्ये अनुसुचित जातीसाठी जागा निश्‍चित करण्यात आल्या. त्यानंतर पहिल्या टप्प्यात अनुसूचित जाती प्रवर्ग महिलांसाठी राखीव असणाऱ्या जागांसाठी शाळकरी विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. यामध्ये २० जागांपैकी १० जागा या महिलांसाठी राखीव करण्यात आल्या. त्यामध्ये प्रभाग क्रमांक ३१, ४, १९, ३२, १७, २३, १०, २१, ३, २९ या मध्ये अनुसुचित जाती (एससी ) जागांसाठी महिलांचे आरक्षण आहे.

तर अनुसचित जमाती (एसटी) साठी लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार ३ प्रभाग निश्‍चित करण्यात आले. नियमानुसार २ प्रभागामध्ये महिला आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली. त्यामध्ये प्रभाग क्रमांक २९ आणि ३० या दोन प्रभागांमध्ये महिलांसाठी जागा राखीव असणार आहे.

तिसऱ्या टप्‍प्‍यात ओबीसी सोडत

आरक्षण सोडत प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) सोडत प्रक्रिया पार पडली. राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी नेमून देण्यात येईल. यानुसार शहरातील ३२ प्रभागा जागा निश्‍चित करण्यात आल्या.

तर उर्वरित दोन जागांसाठी सोडत काढण्यात आली. त्यामध्ये प्रभाग क्रमांक ५ आणि ६ मध्ये ओबीसीसाठी जागा राखीव करण्यात आली. त्यानंतर ज्या प्रभागातील नागरिकांचा मागास प्रवर्गच्या दोन जागा राखीव होतील त्या प्रभागामध्ये एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी थेट राखून ठेवण्यात आली.

तसेच ज्या प्रभागात अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीसाठी जागा आहे, मात्र ती जागा महिलांसाठी आरक्षित झालेली नाही अशा प्रभागातील जागा थेट पद्धतीने नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव निश्‍चित करण्यात आली. तर उर्वरित सहा जागी सोडत घेण्यात आली. त्यानुसार, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी प्रभाग क्रमांक ५, ६, ८, ९, ११, १३, १६, २०, २५, २६, २७, २, १८, २२, १०, ४, १९ या १७ जागा आरक्षित झाल्या.

सर्वसाधारण महिलांसाठी ३५ जागा
सर्वसाधारण महिलांच्या जागा निश्चित करण्यासाठी ज्या प्रभागामध्ये अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग यामध्ये महिलांचे आरक्षण निश्‍चित झाले आहे. तसेच चार सदस्यीय प्रभागामध्ये दोन पेक्षा जास्त महिला येणार नाही याचा विचार करून सर्वसाधारण महिलांसाठी प्रभाग निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार, एकूण ३५ प्रभागांमध्ये सर्वसाधारण महिलांचे आरक्षण आहे.


राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे. त्यामध्ये एकूण जागांपैकी ६४ जागा या महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अनुसुचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिलांसाठीच्या जागा आहेत. सोडत यशस्वी करण्यासाठी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, राजकीय पदाधिकारी व सुजाण नागरिक यांचे सहकार्य लाभले. त्या सर्वांचे आभार. – सचिन पवार, उपायुक्त, निवडणूक विभाग.

 

 

 

 

The post पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक: प्रभागांचे चित्र स्पष्ट appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!