मोठी बातमी! गोविंदाची प्रकृती अचानक बिघडली; बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात केले दाखल

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Govinda : बॅालिवूड अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. त्याची पत्नी सुनीता दोघांच्या नात्याबद्दल अनेक मोठे खुलासे करत आहे. अशातच आता गोविंदाची प्रकृती अचानक बिघडल्याची बातमी समोर आली आहे. त्याला प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चक्कर येऊन गोविंदा बेशुद्ध झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे गोविंदाच्या  चाहत्यांना त्याची चिंता वाटू लागली आहे. बॅालिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून अनेक सेलिब्रिटी त्यांना बघण्यासाठी जात आहेत. गोविंदा देखील धर्मेंद्र यांना बघण्यासाठी रुग्णालयात गेला होता.

सध्या गोविंदाला रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याच्यावर उपचार आहे. बेशुद्ध अवस्थेतमध्ये त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच गोविंदाला पायाला गोळी लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता परत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गोविंदाचे वकील बिंदल यांनी याबद्दलची पुष्टी केली आहे.

The post मोठी बातमी! गोविंदाची प्रकृती अचानक बिघडली; बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात केले दाखल appeared first on Dainik Prabhat.

Source

Join Our WhatsApp Group!