
Election News – आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीत राज व उद्धव ठाकरे एकत्र येणार हे जवळपास निश्चित समजले जात आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये मनसेचा समावेशाची शक्यता धूसर मानली जात असताना, नाशिकमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी महाविकास आघाडीसोबत मनसे एकत्रपणे लढणार असल्याची घोषणा सोमवारी करण्यात आली.
महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अजूनही अधिकृतपणे प्रवेश देण्यात आलेला नाही. असे असताना देखील नाशकात भाजपला रोखण्यासाठी ही युती करण्यात आली असल्याचे आघाडीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर भूमिका स्पष्ट नसतानाही नाशिकमधील काँग्रेस आणि मनसेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत एकत्र येऊन ही घोषणा केली.
मनसे नेते दिनकर पाटील यांनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही आघाडी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. नाशकातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकांमध्ये महाविकास आघाडी व मनसे एकत्र लढणार आहेत. स्थानिक पातळीवर हा निर्णय झाला आहे.
मात्र, विशेष म्हणजे, काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर या आघाडीला विरोध करण्यात आला आहे. नाशकात झालेल्या पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे व मनसेचे नेते एकत्र उपस्थित होते. त्यांच्या या निर्णयामुळे मात्र नाशकात चर्चांना उधाण आले आहे.
The post अखेर जुळलं.! मनसेचा महाविकास आघाडीत प्रवेश झाला; भाजपला रोखण्यासाठी केली मोठी प्लॅनिंग appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











