“कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची”; शेतकऱ्यांबाबत विखे पाटलांचं विधान

Radhakrishna Vikhe Patil |
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Radhakrishna Vikhe Patil |   राज्यात सप्टेंबर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यापार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी शेतकरी कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारने 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले.

परंतु, काही दिवसांपूर्वीच शेतकरी कर्जमाफीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘सारखचं फुकटं कसं मिळेल?’ असे विधान केले होते. त्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्यानंतर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी बाबत वादग्रस्त विधान केले आहे.

भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शुक्रवारी पंढपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी झालेल्या सभेमध्ये विखे पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर भाष्य केलं. ‘कर्ज घ्यायचे, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची’ असं वक्तव्य विखे पाटील यांनी केलं आहे. मात्र चूक लक्षात येताच त्यांनी ‘आपल्या महायुती सरकारने कर्जमाफी जाहीरच केली आहे, आपण शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करणार आहोत’ असं म्हटलं आहे. मात्र त्यांच्या विधानामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे. Radhakrishna Vikhe Patil |

काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?

“सोसायटी काढायची, पुन्हा कर्ज काढायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, अनेक वर्ष काम चालू आहे, याच चिंता करायचं काम नाही. महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहोत. परंतु, तिथंपर्यंत आपलं काम थांबता कामा नये. उद्याच्या तरुणाच्या भविष्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल, उद्योग उभारावे लागणार आहे,” असं म्हणत विखेंनी सारवासारव केली. Radhakrishna Vikhe Patil |

उद्धव ठाकरेंवर टीका

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून, नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत आहेत. यावर बोलताना विखे पाटील यांनी, “कोविडच्या काळामध्ये दोन अडीच वर्षे उद्धव ठाकरे कुठे होते? ते माझं कुटुंब तुमची जबाबदारी म्हणतं लोकांना वाऱ्यावर सोडत घरात बसले होते आणि आता मराठवाड्यात शेतकऱ्यांना दिलासा द्यायला फिरत आहेत”, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. Radhakrishna Vikhe Patil |

हेही वाचा: 

अग्रलेख : बिनचेहर्‍याचे लुटारू

The post “कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची”; शेतकऱ्यांबाबत विखे पाटलांचं विधान appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!