जाणून घ्या पोलीस भरतीतील महत्वाचे बदल! एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन! मैदानी‌ नंतर एकाच वेळी लेखी परीक्षा!

Police Bharti Exam Prepration 2025

मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल खेर पोलीस भरतीला सुरवात झाली आहे. लाखो उमेदवार यासाठी अर्ज करणार आहे. यातच या वेळेस नेमके पोलीस भरती प्रक्रिये मध्ये कोणते महत्वाचे बदल आणि टप्पे आहेत ते जाणून घेऊ या. या २०२५  भरती अंतर्गत पोलीस दलात सुमारे १५ हजार पदांसाठी भरती होणार आहे. या मध्ये राज्यभरात पोलिस शिपाई, चालक शिपाई, बॅण्ड्‌समन, सशस्त्र पोलिस व कारागृह शिपाई, अशी १५ हजार ६३१ पदे भरली जाणार आहे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे. एकाच पदासाठी उमेदवाराने एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज केले तर ते बाद होणार आहेत. चला तर बघूया पूर्ण माहिती..

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Police Bharti Exam Prepration 2025

 

तसेच एक अजून महत्वाचे म्हणजे, पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज करताना दहावी-बारावीचे गुणपत्रक, जन्म दाखला, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल), एमएससीआयटी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर (ज्यांना गरजेचे आहे त्या उमेदवारांसाठी) आणि पोलिस पाल्य, भूकंपग्रस्त, ईडब्ल्यूएस, एसईबीसी, एनसीसी, अनाथ आरक्षणानुसार अर्ज करणाऱ्यांकडे त्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. दरम्यान, चालक शिपायासाठी पुरुष उमेदवारास १६०० मीटर धावणे, गोळाफेक आणि महिला उमेदवारास ८०० मीटर धावणे व गोळाफेक असे दोनच भाग असतील). पण, त्यांना वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी बंधनकारक आहे. खुल्या प्रवर्गातून अर्ज करताना ४५० रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३५० रुपयांचे शुल्क भरावे लागते.

दरम्यान, एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात उमेदवारांना अर्ज करता येणार नाही, असा निकष आहे. पोलिस शिपाई असो किंवा अन्य कोणत्याही एका पदासाठी उमेदवारास राज्यभरात सगळीकडे अर्ज करता येणार नाहीत. त्या उमेदवाराने एका पदासाठी अनेक अर्ज केले, तर त्याचा एकच अर्ज ठेवून बाकीचे अर्ज बाद ठरविले जाणार आहेत. मात्र, वेगवेगळ्या पदासाठी उमेदवार स्वतंत्र अर्ज करू शकतो.

आता बघुत शारीरिक चाचणी बद्दल माहिती…

  • पुरुष महिला गुण
  • १०० मीटर धावणे ८०० मीटर धावणे २०
  • १०० मीटर धावणे १०० मीटर धावणे १५
  • गोळाफेक गोळाफेक १५

 

लेखी चाचणी कशी होणार…

मैदानी चाचणीत किमान ४० टक्के गुण घ्यावे लागतात. त्यातून एका पदासाठी १० उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होते. लेखी परीक्षेसाठी अंकगणित, सामान्यज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न असतात. या परीक्षेत किमान ५० टक्के गुण बंधनकारक असतात. लेखी परीक्षेसाठी ९० मिनिटांचा वेळ असतो. विशेष बाब म्हणजे राज्यातील सर्व जिल्ह्यात लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार आहे. तसेच पोलीस भरतीस उपयुक्त प्रश्नसंच या लिंक वर मोफत सोडवण्यासाठी उपलब्ध आहे.  तसेच तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी आहे का किंवा इतर काही प्रश्न आहेत का? असल्यास कमेंट मध्ये विचारा…

The post जाणून घ्या पोलीस भरतीतील महत्वाचे बदल! एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन! मैदानी‌ नंतर एकाच वेळी लेखी परीक्षा! appeared first on MahaBharti.in.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!