महापालिकेची ‘अभय’ योजना जाहीर! जाणून घ्या कोण आहेत योजनेचे लाभार्थी

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने अभय याेजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी अभय याेजनेचा लाभ घेतलेल्या मिळकतदारांना या वेळी सवलत मिळणार नाही. थकबाकीवर आकारल्या जाणाऱ्या दंडावर सर्व प्रकारच्या थकबाकीदारांना (माेबाइल टाॅवर वगळून) ७५ टक्के सूट देण्यात येणार असून, ही याेजना १५ नाेव्हेंबरपासून सुरू होईल. याेजनेची मुदत १५ जानेवारीपर्यंत असेल.आयुक्त नवल किशाेर राम, अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., कर आकारणी आणि संकलन विभागाचे उपायुक्त अविनाश सकपाळ यांनी याविषयी माहिती दिली.

अभय याेजना राबवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा सुरू हाेती. या याेजनेमुळे मागील थकबाकीदारच पुन्हा लाभ घेत असल्याचा दावा सजग नागरिक मंचने केला हाेता, तसेच ही याेजना राबवली तर पूर्वी लाभ घेतलेल्यांना ही सवलत देऊ नये, अशी मागणी केली हाेती. याशिवाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय दबावातून प्रशासन ही याेजना राबवण्याचा निर्णय घेत असल्याची टीका झाली होती.

यांना मिळणार नाही लाभ..
महापालिकेने यापूर्वी चार वेळा मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय याेजना राबवली हाेती. त्यामध्ये ज्यांना सवलत मिळाली आहे, अशा मिळकतदारांना पुन्हा सवलत दिली जाणार नाही. यापूर्वीच्या अभय याेजनेत एकूण एक लाख ४० हजार ४३७ मिळकतदारांना सवलत मिळाली आहे.

यांना मिळणार सवलत..
यापूर्वी अभय याेजनेसाठी काही अटी- शर्थी ठेवल्या हाेत्या. केवळ निवासी मिळकती, थकबाकीच्या रकमेची अट अशा विविध प्रकारच्या नियमांचा समावेश हाेता. आता सरसकट ही सवलत दिली जाणार आहे. माेबाइल कंपन्यांच्या टाॅवरशी संबंधित मिळकतींचा यात समावेश नाही. सुमारे चार लाख ९७ हजार १७२ थकबाकीदारांना याेजनेत लाभ मिळणार आहे.

दंडाच्या रकमेत ७५ टक्के सवलत..
थकबाकीदारांकडे एकूण १२ हजार १६१ काेटी रुपयांची थकबाकी आहे. महापालिका थकबाकीवर दाेन टक्के इतका दंड आकारते. प्रत्यक्षात या मिळकतदारांकडे तीन हजार १५८ काेटी रुपये थकबाकी आहे. त्यावर सुमारे नऊ हजार दोन काेटी रुपये दंड आहे. याेजनेत मिळकतकरावरील दंडावर ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे. मूळ करात काेणतीही सवलत मिळणार नाही. महापालिकेने याेजनेतून पाच हजार ४०८ काेटींच्या वसुलीचे लक्ष्य ठेवले आहे.

योजनेची जनजागृती..
महापालिकेची जुनी हद्द, यापूर्वी समाविष्ट झालेली नऊ, त्यानंतर समाविष्ट झालेली २३ गावे अशा सर्वच भागातील थकबाकीदारांना लाभ मिळेल. थकबाकीदारांत ६५ हजार व्यावसायिक मिळकतींचा समावेश आहे. अभय याेजनेचा लाभ अधिक थकबाकीदारांनी घेण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे.

The post महापालिकेची ‘अभय’ योजना जाहीर! जाणून घ्या कोण आहेत योजनेचे लाभार्थी appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!