
Tamannaah Bhatia : गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या वेट लॅास ट्रान्सफॅार्मेशनमुळे चर्चेत आली आहे. अचानक वजन कमी झाल्यामुळे सोशल मीडियावरून वजन कमी करण्यासाठी ‘ओझेम्पिक’ किंवा ‘मौंजारो’ औषधं वापरल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. या आरोपांवर अखेर तमन्नाने मौन सोडले आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना तमन्ना म्हणाली, मी वयाच्या १५ व्या वर्षापासून कॅमेऱ्यासमोर काम करत आहे, त्यामुळे माझ्याकडे लपवण्यासाठी काहीही नाही. याआधीही मी अशीच सडपातळ होते. माझं शरीर नेहमीच असंच राहिलं आहे. तांत्रिकदृष्ट्या बोलायचं झाल्यास, हा बदल माझ्यासाठी नवीन नाहीये. मी अशीच मोठी झाली आहे आणि अशीच राहिली आहे, असे स्पष्टीकरण देत तिने होणारे आरोप फेटाळून लावले आहेत.
हिंदी प्रेक्षकांसाठी ही गोष्ट नवीन असू शकते, पण मी जवळपास १०० चित्रपट केले आहेत आणि लोकांनी मला वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या शारीरिक बदलांमध्ये पाहिलं आहे. परंतु, बहुतेक चित्रपटांमध्ये मी सडपातळच राहिली आहे. लोकांना हे समजून घेण्याची गरज आहे की स्त्रियांचे शरीर बदलत राहते, दर पाच वर्षांनी आपल्याला स्वतःचे एक वेगळे रूप दिसते, असे तमन्ना म्हणाली.
सोशल मीडियावरून होणाऱ्या आरोपांना तमन्नाने या मुलाखतीत स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तमन्नाला तिच्या चेहऱ्यावर कसा ग्लो येतो, याचे रहस्य काय आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर तिने दिलेले उत्तर यामुळे ती चर्चेत आली होती.
हेही वाचा : “दोषींना सोडले जाणार नाही,” ; राजनाथ सिंह यांचा इशारा ; लवकरच चौकशी अहवाल सार्वजनिक करणार
The post “हिंदी प्रेक्षकांसाठी ही गोष्ट नवीन असू शकते, पण…”; सोशल मीडियावरून होणाऱ्या आरोपांवर अखेर तमन्नाने मौन सोडलं appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











