
Nora Fatehi : अभिनेत्री नोरा फेतेही तिच्या डान्सिंग स्टाईलमुळे चर्चेत असते. तिने बॅालिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केल्यानंतर काही हिट गाणी दिली आहेत. नुकत्याच एका अमेरिकन पॉडकास्टमळे नोरा फतेही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
या पॅाडकास्टमध्ये नोराला तिची बॅालिवूडमधील सर्वात जास्त आवडती गायिका कोण आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना नोराने प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाला हिचे नावे घेतले. तिला श्रिया घोषाल गायिका म्हणून का आवडते? याचे कारणही तिने सांगितले आहे.
नोरा फतेहीने सिएराच्या पॉडकास्टमध्ये तिच्या गायन, अभिनय आणि नृत्य कारकिर्दीबद्दल मोकळेपणाने गप्पा मारल्या. या गप्पांवेळी नोराला बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायिका म्हणून सर्वात जास्त आवडते असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा नोरा फतेहीने गायिका श्रेया घोषालचे नाव घेतले. नोरा फतेही म्हणाली, “जर तुम्ही बॉलिवूडची गाणी ऐकली नसतील आणि तुम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर मी म्हणेन की श्रेया घोषालची गाणी ऐका. ती एक आयकॉन आहे.”
मी तिच्यासोबत एक गाणे गायले (अरे आई! तेतेमा). हे गाणे गायले आहे, अशी आठवण तिने सांगितली. तिचा आवाज मी ऐकलेल्या सर्वोत्तम आवाजांपैकी एक आहे, असे म्हणत नोराने श्रेयाचे कौतुक केले. बॉलिवूडमधील अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काही उत्तम गाणी तिने गायली आहेत. तिने इतरही अनेक गाणी गायली आहेत, असेही नोराने सांगितले.
ती ज्या पद्धतीने गाते ती अद्भुत आहे. ज्याला बॉलीवूडचे संगीत, संस्कृती आणि आत्मा समजून घ्यायचा आहे त्याने श्रेया ऐकावी, असे आवाहन तिने केले आहे. नोरा फतेहीने बॉलिवूडमध्ये तिच्या कारकिर्दीची सुरुवात नृत्यांगना म्हणून केली. त्यानंतर तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. या वर्षी ती श्रेया घोषाल, जेसन डेरुलो, शेन्सिया आणि हनी सिंग सारख्या कलाकारांसोबत गाण्यांचा भागही बनली होती.
हेही वाचा : अमेरिकेतून आली आनंदाची बातमी ; ट्रम्प म्हणाले,”आम्ही भारतावर लादलेले शुल्क कमी करू”
The post नोरा फतेहीची बॅालिवूडमधील आवडती गायिका श्रेया घोषाल; कौतुक करत म्हणाली “ती ज्या पद्धतीने गाते….” appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











