दिल्लीमध्ये कारमधून स्फोट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो समोर

First photo of Umar।
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

First photo of Umar।  दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणी जम्मू आणि काश्मीरमधील उमर आणि आमिर या दोन तरुणांना काल रात्री अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर आता हा स्फोट ज्याने घडवून आणला त्या दहशतवादी उमर मुहम्मदचा) पहिला फोटो समोर आला आहे. त्याने काल संध्याकाळी स्फोट घडवून आणला होता, ज्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आणि २४ जण जखमी झाले होते.

सोमवारी संध्याकाळी स्फोट घडला त्याच्या अगोदरचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये पार्किंगमधून एक पांढऱ्या रंगाची i20 कार बाहेर पडताना दिसत आहे. त्यात असलेला डॉक्टर हा मोहम्मद उमर असल्याचा संशय आहे. या स्फोटाबाबत पोलिसांनी  उमर हा फरिदाबाद मॉड्यूलचा भाग असण्याची शक्यता वर्तवली आहे. काल जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाणातील फरिदाबाद ते लखनौपर्यंत केलेल्या कारवाईत २९०० किलो स्फोटके (संशयित अमोनियम नायट्रेट) जप्त केली होती.

दिल्ली पोलिस आणि इतर तपास संस्थांच्या तपासात, उमर हा पार्क केलेल्या i20 कारमध्ये तीन तास बसून राहिला. तो एका मिनिट देखील कारमधून बाहेर पडला नाही.” असे समोर आले आहे. त्यासोबाबतच तो या कारमधून हल्ला कसा करायचा, कधी करायचा आणि कुठे करायचा याबद्दल सूचनांची वाट पाहत थांबला होता असेही म्हटले जात आहे. याचदरम्यान, त्याचा एक फोटो समोर आला आहे. याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र अनेक प्रसारमाध्यमांमध्ये  उमरचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे.

पोलिसांकडून दाखल गुन्हा First photo of Umar। 

या स्फोट प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत (UAPA) एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांनी आत्मघातकी हल्ल्याच्या दृष्टिकोनातूनही चौकशी सुरू केली आहे. संपूर्ण घटनेचा प्राथमिक अहवाल लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतरच संपूर्ण सत्य समोर येईल असे सांगितले जात आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये उमरचा चेहरा दिसाला  First photo of Umar। 

लाल किल्ल्याजवळील स्फोटापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये एक आय-२० कार पार्किंगमधून जात असल्याचे दिसून आले आहे. कारच्या आत काळा मास्क घातलेला एक माणूस आहे.

The post दिल्लीमध्ये कारमधून स्फोट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो समोर appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!