“दहशतवादाला समर्थन करणाऱ्यांना देशात जागा नाही”; दिल्ली बॉम्बस्फोटानंतर गडकरींची प्रतिक्रिया

Nitin Gadkari |
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Nitin Gadkari |  सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एका चालत्या कारमध्ये अचानक मोठा स्फोट झाल्याने दिल्ली हादरली. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

या घटनेतील जखमींना जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे पार्क केलेल्या अनेक वाहने जळून खाक झाल्या आहेत. स्फोटानंतर, दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सीमांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

काय म्हणाले नितीन गडकरी ? 

यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. “दिल्लीमधील ही दुर्दैवी घटना आहे. सरकारने याला गंभीरतेने घेतलेले आहे. अशा पद्धतीची कृती करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली जाईल. दहशतवादाला समर्थन करणाऱ्यांना या देशात कुठली जागा नाही. सर्वांनी याचा धिक्कार केला पाहिजे. निरअपराध लोकांचा मृत्यू झाला. त्यातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असेही गडकरी म्हणाले. Nitin Gadkari |

आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की, दिल्ली लाल किल्ला स्फोटाचा संबंध फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी आहे. घटनास्थळावरून जप्त केलेल्या कारमध्ये सापडलेल्या मृतदेहाची डीएनए चाचणी पोलिस करतील जेणेकरून कारमधील व्यक्ती डॉ. उमर मोहम्मद आहे की नाही याची पुष्टी होईल.

गुप्तचर यंत्रणांना संशय आहे की, डॉ. उमर मोहम्मद आय-२० कारमध्ये प्रवासी होता. या व्यक्तीचा सीसीटीव्ही फोटो सापडला आहे, ज्यामध्ये त्याने काळा मास्क घातला आहे. फरिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट जप्त झाल्याची माहिती मिळाल्यानंतर, दिल्ली पोलिस आणि इतर एजन्सी डॉ. उमर मोहम्मदचा शोध घेत आहेत. Nitin Gadkari |

दिल्लीत हाय अलर्ट जारी

लाल किल्ल्याबाहेर मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ झालेल्या मोठ्या कार बॉम्बस्फोटानंतर, संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, मुंबई, उत्तर प्रदेश आणि हरियाणासह अनेक राज्यांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. Nitin Gadkari |

हेही वाचा : 

दहशतवाद्यांचे यूपी कनेक्शन… ! लखनऊ अन् लखीमपूरला जोडणाऱ्या तारा ; मुख्यमंत्री योगींचे अधिकाऱ्यांना कडक आदेश

The post “दहशतवादाला समर्थन करणाऱ्यांना देशात जागा नाही”; दिल्ली बॉम्बस्फोटानंतर गडकरींची प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!