तटकरे हळूहळू पक्ष टेकओवर तर करत नाहीत ना? सुषमा अंधारेंच्या पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Sushma Andhare post : स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात मोठे संघटनात्मक बदल करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. इतर राजकीय पक्षांनी देखील निवडणुकीच्या दृष्टीने विश्वासू शिलेदारांवर मोठ्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत.

भारतीय जनता पार्टीने तर जिल्ह्यानुसार प्रभारींची नियुक्ती केली आहे. शिंदे सेना, उबाठा गट यांच्याकडून देखील निवडणुकीच्या दृष्टीने मोठे बदल करून तयारीने वेग घेतला आहे. पण सध्या अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चर्चेत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील मोठे बदल करण्यात आलेले आहेत. पण हे बदल सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणणारे आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नुकतीच १७ प्रवक्त्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे पक्षाची भूमिका मांडणारे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी, रूपाली पाटील-ठोंबरे, वैशाली नागवडे आणि संजय तटकरे यांची गच्छंती करण्यात आली आहे. यामध्ये मिटकरी आणि ठोंबरे पाटील यांची गच्छंती चर्चेचा विषय ठरत आहे. पक्षाने घेतलेल्या निर्णयावर उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फेसुबक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

कुठल्याही पक्षाने पदाधिकारी नेमणे हा त्यांचा पूर्णतः अंतर्गत विषय आहे. मात्र तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या या यादीतील एकूण नाव बघता एक फरक लक्षात येईल. अमोल मिटकरी आणि रूपाली ठोंबरे हे दोन्ही प्रवक्ते कायम दादांसाठी खिंड लढवत असतात मात्र त्यांना या यादीत स्थान नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

पण अगदी त्याच वेळेला मित्र पक्षातल्या आमदारांकडून दादांवर पराकोटीची जहरी टीका होताना अतिशय मौन बाळगणारे सुरज चव्हाण तटकरेंवर कोणी चकार शब्द काढला तर अगदी मारामारी करण्यापर्यंतची तत्परता दाखवू शकतात. कदाचित म्हणूनच या यादीत सुरज चव्हाणला स्थान आहे. थोडक्यात काय जो दादांची बाजू घे त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. तटकरे हळूहळू पक्ष टेकओवर तर करत नाहीत ना ? असा संशय व्यक्त करणारा सवाल अंधारेंनी विचारला आहे.

या कारणांची जोरदार चर्चा

पक्षाची बाजू मांडणारे अमोल मिटकरी आणि रुपाली पाटील ठोंबरे ही दोन्ही नाव अत्यंत महत्वाची मानली जातात. महायुतीतील पक्षांच्या विरोधात भूमिका घेणे हे अमोल मिटकरी यांना महागात पडल्याची चर्चा आहे, तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याविरोधात जाहीर भूमिका घेणे हे रूपाली पाटील यांच्यासाठी घातक ठरल्याचे बोलले जात आहे.

नव्या प्रवक्त्यांची नावे

अनिल पाटील, चेतन तुपे, सना मलिक, हेमलता पाटील, राजीव साबळे, सायली दळवी, रूपाली चाकणकर, आनंद परांजपे, शशिकांत तरंगे, राजलक्ष्मी भोसले, प्रतिभा शिंदे, प्रशांत पवार, ब्रिजमोहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, सूरज चव्हाण, विकास पासलकर आणि श्याम सेनर.

हेही वाचा : दहशतवाद्यांचे यूपी कनेक्शन… ! लखनऊ अन् लखीमपूरला जोडणाऱ्या तारा ; मुख्यमंत्री योगींचे अधिकाऱ्यांना कडक आदेश

The post तटकरे हळूहळू पक्ष टेकओवर तर करत नाहीत ना? सुषमा अंधारेंच्या पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!