“माझी देशाचे पंतप्रधान व गृहमंत्र्यांना….”; दिल्लीतील स्फोटानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Sharad Pawar Post : काल देशाला हादरून सोडणारी घटना देशाची राजधानी दिल्लीत घडल्याने देशभरात एकच खळबळ उडाली. देशाची राजधानी दिल्लीत लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक बाहेर एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, १० ते १२ जणाांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालायत उपचार सुरू आहेत.

या स्फोटोनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील तपास करण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी केलेल्या आतापर्यंतच्या तपासात हा हल्ला आत्मघाती असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेनंतर दिल्लीत सर्वच ठिकाणी भयभयीत वातावरण तयार झाले आहे.

देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या दुर्देुवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. या स्फोटानंतर देशभरातील विविध शहरांला अलर्ट जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेत राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पोलिसांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

या घटनेनंतर देशाचे माजी कृषीमंत्री खासदार शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नल परिसरात एका कारमध्ये झालेल्या स्फोटात झालेली जीवितहानी अतीव दुःखद आहे. मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो व ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त करतो, असे शरद पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

तसंच, जखमी नागरिकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो. लाल किल्ल्यासारख्या संवेदनशील परिसरात घडलेली ही दुर्दैवी घटना फार चिंताजनक आहे. माझी देशाचे पंतप्रधान व गृहमंत्र्यांना विनंती आहे कि, सदर घटनेबाबत सखोल चौकशी करावी. त्यायोगे येणारा चौकशी अहवाल देशासमोर ठेवून अशा दुर्घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावलं उचलतील अशी अपेक्षा व्यक्त करतो, अशी विनंती शरद पवार यांनी केली आहे.

सीसीटीव्ही फुटेज आले समोर 

मिळालेल्या माहितीनुसार, तपासात हा आत्मघाती हल्ला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्फोटापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये ट्रॅफिकमधून एक आय-२० कार जात असल्याचे दिसून आले आहे. या कारमध्ये काळा मास्क घातलेला व्यक्ती दहशतवादी मोहम्मद उमर असल्याचे मानले जात आहे. तो उमर हा जैश-ए-मोहम्मद मॉड्यूलशी संबंधित असल्याचंही सांगितले जात आहे.

हेही वाचा : दिल्ली कारस्फोटावर असदुद्दीन ओवैसींची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले,”यामध्ये सहभागी असलेले…”

The post “माझी देशाचे पंतप्रधान व गृहमंत्र्यांना….”; दिल्लीतील स्फोटानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले? appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!