दिल्ली स्फोटानंतर फडणवीसांनी राज्यातील सुरक्षेचा घेतला आढावा; पोलिसांना सतर्कतेचा आदेश

Mumbai-Pune High Alert |
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Mumbai-Pune High Alert |  दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी देशातील सर्व प्रमुख शहरांना हाय अलर्ट जारी केला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मुंबई पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा घेतला आहे. तसेच राज्यातील सर्व प्रमुख शहर आणि जिल्ह्यांतील पोलीस यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्याची सूचना केली आहे.

मुंबईतील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याआधी 26/11 बॉम्ब हल्ला झाला होता तेव्हा सीएसएमटी स्थानकावर दहशतवाद्यांनी मोठा हिंसाचार केला होता. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता पोलीस अलर्ट मोडवर आहेत.

वर्दळीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ

मुंबई पोलिसांनी सीएसएमटी स्थानकांवर डॉग स्क्वॉड आणि इतर यंत्रणांच्या मदतीने सर्चिंग केलं आहे. तसेच मुंबईच्या प्रभादेवी येथील अतिमहत्त्वाचं अशा सिद्धीविनायक मंदिराच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. तसेच मुंबईत वर्दळीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. Mumbai-Pune High Alert |

पोलिसांकडून प्रत्येक पॉईंटवर तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे केवळ पोलीस वेशातच नाही तर सिव्हिल ड्रेसमध्ये सुद्धा पोलिसांकडून गस्त घातली जात आहे. कोणतीही गोष्ट संशयित आढळल्यास पोलिसांकडून लगेच तपास केला जात आहे.   Mumbai-Pune High Alert |

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेरील सुरक्षाही वाढवली 

याशिवाय पुणे शहरातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्ट देण्यात आला आहे. दिल्ली घटनेनंतर पुणे पोलीस आयुक्तांनी ही सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचा दिल्या सूचना दिल्या आहेत. शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानके, विमानतळ, मॉल्स, सिनेमा थिएटर्स, धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या भागांमध्ये पोलिस गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरा बाहेरील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी गुजरात दहशतवादविरोधी पथकाने  तीन संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती मिळाल्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीर पोलिसांनी फरीदाबादमधील एका डॉक्टरकडून मोठ्या प्रमाणावर बॉम्ब बनवण्याचा साठा जप्त केला होता. या सर्व घटनांमुळे देशातील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.  Mumbai-Pune High Alert |

हेही वाचा : 

satara news: जनतेचा विकास डोळ्यासमोर ठेवूनच सुनील माने यांची घरवापसी उपमुख्यमंत्री अजित पवार; रहिमतपूरमध्ये सुनील मानेंसह असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

The post दिल्ली स्फोटानंतर फडणवीसांनी राज्यातील सुरक्षेचा घेतला आढावा; पोलिसांना सतर्कतेचा आदेश appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!