
प्रभात वृत्तसेवा
पुणे – मौजे बोपोडी येथील सीटीएस नं. ३ व ४, प्लॉट नं. १४ (सर्व्हे नं. ६२) ही जमीन पेशवे काळापासून विद्वांस यांच्याकडे आहे. मोडी लिपीमध्ये याचे कागदपत्र उपलब्ध आहेत. १९३० पासून या जागेचा सात-बारा विद्वांस यांच्या नावावर आहे. विद्वांस यांचे इनाम कधीही काढलेले नसून, ते आतापर्यंत कायम आहे. विद्वांस यांच्याकडून ही जागा विकत घेतली असून, या जागेवर माझा ताबा आहे, असा दावा बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच कृषी महाविद्यालय या जागेवर भाडेकरू असून, ते मालक नसल्याचेही गवंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
बोपोडी येथील कृषी महाविद्यालयाच्या जागेबाबत वस्तुस्थिती सांगण्यासाठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी हा दावा केला. यावेळी विद्वांस परिवारातील काही सदस्यही उपस्थित होते. यावेळी गवंडे यांनी सांगितले की, यशदा विद्वांस यांचे नाव या जागेवर होते आणि कृषी महाविद्यालय यांचे भाडेकरू म्हणून नेमण्यात आले आहे. १९७५ पासून आतापर्यंत कृषी महाविद्यालय यांनी याबाबत कोणते अपील केलेले नाही.
पुणे जिल्हाधिकारी यांनी आम्हाला जागा मालक म्हणून पत्र पाठवून या जागेवर बस टर्मिनलसाठी जागा असल्याचे सांगितले आहे. त्यातही आमचा मालकी हक्क नमूद केलेला आहे. २० कोटी रुपये भरपाई मोबदला देण्याचे मनपाने सांगितले. मात्र, आम्ही ते अद्याप घेतलेले नाही. कृषी विद्यापीठाने या जागेबाबत याचिका दाखल करून मालक असल्याचा दावा केला.
पण न्यायालयाने ते अपिल फेटाळून लावले आहे. कारण या जागेवर विद्वांस यांची मालकी दिसून आली आहे. या जागेवर आम्ही कोणती खोटी मोजणी केलेली नसून, भूसंपादन मोजणी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात झाली आहे. प्रॉपर्टी कार्डवरदेखील माझे नाव आहे. त्याचा नियमित कर आम्ही भरत आहोत, असेही गवंडे यांनी सांगितले.
अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी किंवा अमेडिया कंपनीचे इतर भागीदार यांच्याशी कोणताही व्यवहार झालेला नाही. माझा त्यांचा परिचय नसून, मी त्यांना कधी भेटलोही नाही. त्यामुळे माझा दाखल गुन्ह्याशी काही संबंध नाही. हा दाखल झालेला गुन्हा गैरसमजुतीने, खोट्या पद्धतीने झाला असून, तो निराधार आहे, असे स्पष्टीकरण गवंडे यांनी पत्रकार परिषदेत दिले.
The post बोपोडीतील त्या जागेचे आम्हीच मालक! कृषी महाविद्यालय मालक नाही तर भाडेकरू – हेमंत गवंडे यांचा दावा appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











