अनेकांची धाकधूक वाढली! महापालिकेच्या आरक्षण सोडतीकडे शहराचे लक्ष; आज होणार फैसला

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत कार्यक्रम मंगळवारी (दि ११) सकाळी ११ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या आरक्षण सोडतीच्या कामासाठी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ही सोडत त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून या आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाची तयारी पूर्ण झाली आहे.

महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडतीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १०) प्राधिकृत अधिकारी डॉ. पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली रंगीत तालीम देखील पार पडली. डॉ. पुलकुंडवार यांनी आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाने केलेल्या तयारीची संपूर्ण माहिती घेतली. तसेच आरक्षण सोडतीच्या दिवशी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

यावेळी पोलीस प्रशासन व महापालिकेच्या सुरक्षा विभागाच्या वतीने आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह व परिसरातील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह परिसरात शासकीय वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असणार आहे. तरी आरक्षण सोडतीच्या ठिकाणी खासगी वाहने आणू नयेत, असे आवाहन महापालिकेच्या निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

चार टप्प्यात पार पडणार आरक्षण सोडत
-महापालिका प्रभागांमध्ये राखीव जागा वाटप करून नियम २०२५ नुसार प्रथम अनुसूचित जाती महिला आरक्षण सोडत काढणे.
-अनुसूचित जमाती महिला आरक्षण सोडत काढणे.
-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाची सोडत काढणे व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांकरीता वाटप करणे. नियमानुसार कारवाई करणे.
-सर्व साधारण महिलांकरीता जागा नेमून देणे.

The post अनेकांची धाकधूक वाढली! महापालिकेच्या आरक्षण सोडतीकडे शहराचे लक्ष; आज होणार फैसला appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!