आता चांदीवरही मिळणार कर्ज! रिझर्व बँकेचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवे नियम

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

मुंबई  – व्यवसायिक बँकांबरोबरच सहकारी बँका बिगर बँकिंग वित्तीय संस्था 1 एप्रिल 2026 पासून चांदीचे दागिने आणि नाण्याच्या तारणावर कर्ज ग्राहकांना उपलब्ध करणार आहेत. यासंदर्भात रिझर्व बँकेने नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

रिझर्व बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार सोन्याच्या एक किलोग्रॅम पेक्षा जास्त दागिन्याच्या तारणावर आणि चांदीच्या दहा किलोग्रॅमपेक्षा जास्त दागिन्याच्या कारणावर कर्ज घेता येणार नाही. नाण्यासंदर्भातील नियमानुसार सोन्याच्या 50 ग्रॅम पर्यंतच्या नाण्यावर कर्ज घेता येईल तर चांदीच्या 500 ग्रॅम पर्यंतच्या दागिन्यावर कर्ज घेता येणार आहे.

सोने आणि चांदीचे दागिने व नाण्याच्या तारणावर घेतलेले कर्ज जर संबंधित कालावधीच्या आत परत केले नाही तर कर्ज देणारी बँक किंवा संस्था संबंधित दागिने आणि नाण्याची बोलीद्वारा विक्री करू शकते. मात्र त्यासाठी बँकांनी संबंधित कर्ज घेणार्‍याला याची स्पष्ट माहिती देणे अपेक्षित आहे. जर यासंदर्भातील नोटीस देण्यास ग्राहक उपलब्ध नसेल तर सार्वजनिक नोटीस जारी करावी लागेल आणि त्यानंतर एक महिन्याने संबंधित सोने आणि चांदीची विक्री करता येईल.

बोली जारी करताना संबंधित सोने आणि चांदीचे मूल्य सध्याच्या बाजारभावापेक्षा 90% पेक्षा कमी असता कामा नये. दोन वेळा बोली आल्या नाहीत तर तिसर्‍या वेळी सोन्याने चांदीची किमान किंमत 85 टक्क्यापेक्षा कमी असू नये.

कर्जाची परतफेड करूनही बँकेने जर संबंधित सोने आणि चांदी ग्राहकाला परत केले नाही तर प्रत्येक दिवसाला पाच हजार रुपयांचा दंड होणार आहे. जर कर्ज परतफेड करूनही संबंधित सोने आणि चांदी बँकेकडे राहिली तर दोन वर्षानंतर बँका संबंधित ग्राहकाला शोधून ते सोने आणि चांदी ग्राहकाला परत करण्याचा प्रयत्न करतील. अगोदर सोन्याच्या तारणावर कर्ज मिळत होते आता चांदीच्या तारणावरही कर्ज मिळणार आहे. चांदीचे दर गेल्या वर्षात मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे चांदी बाळगणार्‍या ग्राहकांना कर्ज मिळण्यास सोय होणार आहे.

The post आता चांदीवरही मिळणार कर्ज! रिझर्व बँकेचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवे नियम appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!