जागतिक ऑटो इंडस्ट्रीत भारताचा डंका; टाटाचे शैलेश चंद्र ओआयसीएचे अध्यक्ष

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली  – जागतिक मोटार उत्पादक संघटनेच्या (ओआयसीए) अध्यक्षपदावर टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश चंद्र यांची निवड झाली आहे. त्यांनी 1 नोव्हेंबर 2025 पासून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
भारतातील मोटार उत्पादकाची संघटना असलेल्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स या संघटनेचे शैलेश चंद्र अध्यक्ष आहेत. जागतिक मोटार उत्पादक संघटनेच्या अध्यक्षपदी या अगोदर अमेरिकेतील वाहन कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन मोझेला होते.

आपला पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना शैलेश चंद्र यांनी सांगितले की, जागतिक मोटार उद्योग सध्या मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. परंपरागत इंधनाऐवजी नव्या इंधनावर वाहन निर्मिती करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत.

निसर्गाच्या समतोलाच्या दृष्टिकोनातून वाहन कंपन्या स्वच्छ इंधनाच्या आधारावर नवी वाहने तयार करीत आहेत. अशा परिस्थितीत या संघटनेचे नेतृत्व आपल्याकडे आले आहे. जागतिक पातळीवर वाहन निर्मिती शाश्वत स्वरूपाची व्हावी वाहनाचे दर कमी व्हावे यासाठी आपण प्रयत्न करू असे ते म्हणाले.

The post जागतिक ऑटो इंडस्ट्रीत भारताचा डंका; टाटाचे शैलेश चंद्र ओआयसीएचे अध्यक्ष appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!