
पुणे : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून संगठित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख निलेश घायवळ याच्या आर्थिक व्यवहारांचा तपास अंमलबजावणी संचालनालयाला (ED) करण्याची शिफारस करण्यात आली आहे. घायवळविरुद्ध विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्याने गुन्हेगारीतून मोठी संपत्ती कमावल्याचा संशय आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीविरुद्ध एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये खंडणी, गुन्हेगारी कट, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, खूनाचा प्रयत्न आणि मालमत्ता बळकावण्यासाठी दुखापत करणे अशा गंभीर कलमांचा समावेश आहे.
तपासादरम्यान पोलिसांना घायवळच्या मोठ्या आर्थिक उलाढालीचे पुरावे मिळाले आहेत. त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी धाराशिव, अहमदनगर, बीड, सातारा आणि परिसरात विंड पॉवर प्रकल्पांशी संबंधित गैरव्यवहार, खंडणी आणि बेकायदेशीर व्यवहारांद्वारे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या संदर्भातील एफआयआर आणि पुरावे ईडीकडे पाठविण्यात आले असून, तपासादरम्यान मनी लॉन्ड्रिंगचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, घायवळने बेकायदेशीर मार्गाने पासपोर्ट मिळवला असल्याचेही समोर आले असून, तो सध्या परदेशात फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
The post पुणे गुन्हे शाखेकडून ईडीला पत्र; घायवळच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची विनंती appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











