बीडच्या राजकारणातून मोठी बातमी, शरद पवार गटाच्या आमदाराला बसणार झटका, सख्खा भाऊ भाजपच्या वाटेवर,

बीडच्या राजकारणातून मोठी बातमी, शरद पवार गटाच्या आमदाराला बसणार झटका, सख्खा भाऊ भाजपच्या वाटेवर,
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

मागच्या आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या. येत्या 2 डिसेंबरला या निवडणुका होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी आहे. त्यानंतर जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे मिनी विधानसभेची निवडणूक म्हणून पाहिलं जातं. गाव पातळीवर, तालुका आणि जिल्हा स्तरावर अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागते. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी तळागाळातील कार्यकर्ते, थेट जनतेशी संबंधित असल्यामुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त पक्ष विस्तार करण्याचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असतो. मागच्या चार-पाच वर्षात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्या आता होत असल्याने प्रत्येक पक्ष कंबर कसून निवडणुकीत उतरला आहे.

नगरपालिका, नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पक्ष बदल होताना दिसतायत. एकारात्रीत एका पक्षातले लोक दुसऱ्या पक्षात जाताना दिसतायत. सर्वसामान्यांसाठी हा धक्का आहे. पण पक्ष बदल करणारे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांच्यासाठी ते राजकीय भविष्य सुरक्षित करणं आहे. आता बीडच्या राजकारणातून मोठी बातमी येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर आहेत. संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटाचे आमदार आहेत.

भाजपा प्रवेश निश्चित होतोय

याबाबतीत हेमंत क्षीरसागर यांनीच स्पष्टता दिलीय. आजपर्यंतच्या निवडणुकीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत राहिलेले त्यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर यांचा भाजपा प्रवेश निश्चित होतोय. विकासाचा दृष्टिकोन ठेवून भाजपा बरोबर जात असल्याचं क्षीरसागर यांनी स्पष्ट केलंय. आतापर्यंत बीड विधानसभा मतदार संघात हेमंत क्षीरसागर यांची संदीप क्षीरसागर यांना साथ राहिली. मात्र आता सख्ख्या भावाकडूनच संदीप क्षीरसागर यांना राजकीय आव्हान मिळणार असे चित्र दिसत आहे. याच संदीप क्षीरसागर यांनी सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण लावून धरलं होतं. बीडमधील गुन्हेगारीचा विषय त्यांनी उचलून धरलेला. त्यामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता याच संदीप क्षीरसागर यांचे सख्खे बंधु भाजपच्या वाटेवर आहेत.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!