
शिरूर – टाकळी हाजी ता. शिरूर येथे दि. ०४ नोव्हेंबर रोजी घडलेल्या जबरी चोरीप्रकरणाचा शिरूर पोलीसांनी केवळ तीन दिवसांत यशस्वी तपास करून उलगडा केला आहे. आरोपीसह चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सोनाऱ्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
तपासातील काटेकोरपणा आणि तांत्रिक विश्लेषणामुळे हा गुन्हा पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी अल्पावधीत उघड केला आहे. सुशिला पाडुरंग घोडे नावाच्या महिला निघोज येथे भाजीपाला विक्री करून स्कुटीवरून टाकळी हाजीकडे येत होत्या. त्यादरम्यान होणेमळ्याजवळ अज्ञात इसमाने मोटरसायकलवरून येत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत टाकळी हाजी आऊट पोस्टचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी पथकासह तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला.
त्यानंतर अखेर आरोपी सुनील रामदास कांदळकर (रा. अळकुटी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) याचा माग काढत त्याला पोलीसांनी गजाआड केले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर चोरीचे सोने ज्या सोनाऱ्याला विकले होते त्या प्रसाद तारकचंद बेल्हेकर (रा. अळकुटी, ता. पारनेर) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
या कारवाईमुळे परिसरात निर्माण झालेली भीती कमी झाली असून नागरिकांकडून टाकळी हाजी पोलिसांच्या चोख कामगिरीचे कौतुक केले आहे.
The post शिरूर : सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढणारा आरोपी ताब्यात; सोनाऱ्यावरही कारवाई appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











