मुंढवा जमीन प्रकरणात नवा पेच! जमीन व्यवहार रद्द करायचाय, पण विक्रेता फरार असल्याने मोठी अडचण

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मुंढवा येथील शासनाच्या मालकीची 40 एकर जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिंरजीव पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी कंपनीने या जमिनीचा खरेदी करार रद्द करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, या व्यवहाराचा दस्त रद्द करण्यासाठी खरेदीदार आणि विक्री करणारे असे दोन्ही समक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर विक्री करणाऱ्या शीतल तेजवानी फरार असल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे हा खरेदी दस्त करण्यासाठी अडचणी येणार असल्याचे सांगितले जात आहे.मुंढवा येथील शासनाच्या मालकीची ४० एकर जमीन पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया एंटरप्रायझेसने तीनशे कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे. हा व्यवहार ‘अमेडिया’चे भागीदार दिग्विजयसिंह पाटील व कुलखत्यारधारक शीतल तेजवानी यांच्यामध्ये झाला आहे. दस्त नोंदणीवेळी या कंपनीने जागेवर डेटा सेंटर उभारण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हा उद्योग केंद्राकडून मुद्रांक शुल्कात माफी घेण्यात आली.

याशिवाय दुय्यम निबंधकांनी देखील दस्तांवरील पाच टक्के मुद्रांक शुल्क माफ करण्याऐवजी सात टक्के शुल्कमाफी दिली आहे. शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हा व्यवहार घेता करण्यात आला. त्यामुळे याप्रकरणी शासकीय जमिनींचा अपहार झाल्यामुळे शीतल तेजवानी आणि अमेडिया एंटरप्रायझेसचे दिग्विजय पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर हे खरेदीखत रद्द करण्याचा निर्णय कंपनीच्या वतीने घेण्यात आला आहे.

त्यासाठी कंपनीच्या लोकांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊनही चौकशी केली होती; परंतु हा दस्त रद्द करण्यासाठी कॅन्सल डिड करावे लागणार आहे. त्यासाठी ज्या दोघांमध्ये हा व्यवहार झाला आहे, त्या दोघांनाही हजर राहून तो रद्द करावा लागणार आहे; परंतु या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यामुळे कॅन्सल डिड करण्यासाठी तेजवानी यांना प्रत्यक्ष हजर राहावे लागणार आहे. व्यवहार रद्द करण्यासाठी त्या हजर राहणार का, याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

The post मुंढवा जमीन प्रकरणात नवा पेच! जमीन व्यवहार रद्द करायचाय, पण विक्रेता फरार असल्याने मोठी अडचण appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!