धक्कादायक घटना! पेट्रोल पंपावरील कामगारांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू; चार कामगारांवर गुन्हा दाखल

CRIME
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तरुणाला पंपावरील कामगारांनी बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना वारजे भागात घडली. तरुणाला बेदम मारहाण करून त्याच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी चार कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.यश राजेंद्र पवार (२०, रा. कापडे, पोलादपूर, जि. रायगड) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील राजेंद्र बाबूराव पवार (रा. कापडे, पोलादपूर, जि. रायगड) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पेट्रोल पंपावरील कामगार शिवराज अंबाराया गुत्ती (२३), जीवन महादेव कवे (२५, दोघे रा. अहिरे गाव, गणपती माथा, वारजे माळवाडी), संकेत धनाजी लंकेश्वर (२५, रा. उत्तमनगर, एनडीए रस्ता), रितेश राजेंद्र गायकवाड (२२, रा. जय गणेश अपार्टमेंट, सह्याद्री शाळेजवळ, वारजे माळवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजेंद्र पवार यांचा मुलगा यश हा तीन मित्रांसोबत दुपारी तीनच्या सुमारास शेल पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आला होता.

त्यावेळी दुचाकी रांगेत लावण्यावरून वाद झाला. यामध्ये कामगारांनी यशला बेदम मारहाण केली. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुलगा यशला याला पेट्रोल पंपावरील कामगारांनी बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वडील राजेंद्र पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार याप्रकरणी शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर रायगोंडा पुढील तपास करीत आहेत.

The post धक्कादायक घटना! पेट्रोल पंपावरील कामगारांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू; चार कामगारांवर गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!