निवडणुकीचा महासंग्राम! १७ नगरपालिकांच्या ३९८ जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – जिल्ह्यातील एकूण 17 नगरपालिकांच्या 398 सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून (दि. 10) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून त्याची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर करावा लागणार आहे, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली आहे.राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या असून, पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी आचारसंहिता लागू झाली आहे.

या निवडणुकीसाठी दि.1 जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार या निवडणुकीसाठी 6 लाख 34 हजार 940 मतदार आहेत. या १४ नगरपरिषदांपैकी बारामती ही अ वर्ग नगरपरिषद आहे, तर लोणावळा, दौंड, चाकण, तळेगाव दाभाडे व फुरसुंगी- उरळी देवाची या पाच नगरपरिषदा ब वर्गामध्ये आहेत, तर क वर्गामध्ये सासवड, जेजुरी, इंदापूर, शिरूर, जुन्नर, आळंदी, भोर आणि राजगुरूनगर यांचा समावेश होतो. मंचर, वडगाव मावळ आणि माळेगाव बुद्रुक यांचा समावेश नगरपंचायतींमध्ये होतो.

एक वर्षांपूर्वी नव्याने अस्तित्वात आलेल्या फुरसुंगी- उरळी देवाची नगरपरिषदेसह मंचर आणि माळेगाव या नगरपंचायतीसाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. फुरसुंगी- उरळी देवाची नगरपालिकेसाठी द्विसदस्य पद्धतीने निवडणूक होणार असून, एकूण प्रभाग संख्या ही १६ असणार आहे, तर ३२ नगरसेवकांची संख्या असणार आहे. या निवडणुकीतून नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी थेट निवडणुकीच्या माध्यमातून अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे.

निवडणुकीचे वेळापत्रक
-उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी – दि.10 ते 17 नोव्हेंबर 2025 (दुपारी तीन वाजेपर्यंत)
-उमेदवारी अर्जांची छाननी – दि.18 नोव्हेंबर 2025
-उमेदवारी अर्ज मागे – दि. 19 ते 21 नोव्हेंबर 2025 (दुपारी तीन वाजेपर्यंत)
-निवडणूक चिन्ह वाटप – दि. 26 नोव्हेंबर 2025
-मतदान – दि. 2 डिसेंबर 2025
-मतमोजणी – दि. 3 डिसेंबर 2025

The post निवडणुकीचा महासंग्राम! १७ नगरपालिकांच्या ३९८ जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!