
प्रभात वृत्तसेवा
कापूरहोळ – कुरूंगवडी (ता. भोर) येथील गावचे हद्दीत पत्र्याचा वाडा धनगरवस्ती येथे घराच्या बांधकामासाठी आणलेली क्रश सॅण्ड डंपर ट्रॉलीमधून घराच्या समोर रिकामी करत असताना हायड्रॉलिकने उचललेल्या ट्रॉलीचा तोल जाऊन ट्रॉली डंपरसह शेजारील पत्र्याच्या घरावर कोसळून घरामधील मुलांसह त्यांची आई क्रश सॅण्ड खाली गाडले गेले. या दुर्घटनेत आईसह दोन मुलांना वाचविण्यात यश आले; मात्र एक पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.
धोंडीबा रामभाउ कचरे यांनी राजगड पोलिस ठाण्यात डंपरचालका विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. आलोक अशोक कचरे (वय ५) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर त्याची आई आरती अशोक कचरे (वय ३५), प्रियांका जगन्नाथ कचरे (वय १७), श्लोक अशोक कचरे (वय ६) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. डंपर चालक अमरजीत राजभर याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.अधिकचा तपास राजगड पोलीस करीत आहेत.
The post हृदयद्रावक! डंपरसह ट्रॉली घरावर कोसळली, वाळूखाली गाडून ५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











