काळेवाडीत थरार! जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न; एक अटकेत

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका १७ वर्षीय मुलावर कोयत्याने आणि सिमेंटच्या गट्टूने वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि. ७) रात्री श्रीनगर काळेवाडी येथे घडली.या प्रकरणी शुभम संजय चव्हाण (१७, थेरगाव) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल भिमराव कांबळे (२२, श्रीनगर काळेवाडी), हर्षद (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), सोबत दोन विधी संघर्षित बालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम आणि त्यांचा मित्र यश चौधरी घरी जात असताना, शुभम यांच्या ओळखीचे आरोपी अचानक आडवे आले. आरोपी विशाल याने यश चौधरी याला धमकी देत नवरात्रीच्या वेळी झालेल्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ केली. यानंतर विशाल याने कमरेला लावलेला लोखंडी कोयता काढून शुभम यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात मारून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.

इतर आरोपींनी सिमेंटचे गट्टू उचलून शुभमच्या डोक्यात, तोंडावर जोरजोरात मारले. यात शुभम गंभीर जखमी झाले. आरोपींनी यश चौधरी यांनाही मारहाण केली. लोक मदतीला येत असल्याचे पाहून विशाल याने हातातील कोयता हवेत उंचावून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

The post काळेवाडीत थरार! जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न; एक अटकेत appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!