
बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा या सध्या चांगल्याच चर्चेमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी सुनीता यांनी आपलं एक यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सुनीता यांच्या या यूट्यूब चॅनलचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील झाले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा सुनीता आपल्या एका मुलाखतीमुळे चर्चेमध्ये आल्या आहेत. या मुलाखतीमध्ये सुनीता यांनी गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यामधील भांडणं आणि नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे.
या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या पर्सनल लाईफबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी कृष्णाची आई पद्मा शर्मा म्हणजेच गोंविदाच्या बहिणीसोबत आपले सबंध कसे होते? याबाबत मोठा खुलासा केला आहे. यावेळी बोलताना सुनीत यांनी म्हटलं की, कृष्णाची आई पद्मा शर्मा या मला खूप आवडत होत्या, सगळ्यात आधी गोविंदा आणि माझ्या अफेअरबद्दल त्यांनाच माहिती झालं होतं. त्यांनी आम्हाला सपोर्ट केला, आज गोविंदाला जे काही यश मिळालं आहे, त्यात त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे, असंही यावेळी सुनीता यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी सुनीता यांना कृष्णा आणि त्याची पत्नी काश्मिरा शाहा यांच्यासोबत सुरू असलेल्या वादाबाबत विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी म्हटलं की, मी किती दिवस त्यांच्यावर नाराज राहू शकते, जर सर्व जण आप आपल्या जागेवर आनंदी आहेत, तर मग वाद कशासाठी असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थिती केला.
दरम्यान यापूर्वी देखील अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता या चांगल्याच चर्चेमध्ये राहिल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार गोविंदा आणि सुनीता यांच्यामध्ये देखील काही वाद होते, नात्यामध्ये तणाव निर्माण झाला होता, अशा बातम्या माध्यमातून समोर आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आता ही मुलाखत दिली आहे, यामध्ये त्यांनी मोठा खुलासा केला आहे, त्यांनी गोविंदा आणि त्याचा भाच्चा कृषा अभिषेक यांच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











