Matoshree Mumbai : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे. मातोश्री बंगल्याच्या बाहेर जी जागा संवेदनशील म्हणून आहे, अशा ठिकाणी असा प्रकार समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पण हे ड्रोन नेमके येथे काय करत होते याबाबत मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे.
आज वांद्रे येथील मातोश्री बंगल्याशेजारील परिसरात एक अज्ञात ड्रोन घिरट्या घालताना आढळून आला. खरंतर या परिसरात कोणत्याही प्रकारचे ड्रोन किंवा हवाई साधन उडवण्यास बंदी आहे. अशातच ठाकरेंच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘मातोश्री’ हा उच्च सुरक्षा झोन असल्याने हा प्रकार गांभीर्याने घेतला जात आहे. या प्रकारामुळे चर्चांना उधाण आले आहे.
या ड्रोन उड्डाणाबाबत मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे. एमएमआरडीएच्या परवानगीनेच हा ड्रोन उडवण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. ड्रोनचे हवाई उड्डाणचेकारणही पोलिसांनी सांगितले आहे. एमएमआरडीएचे सर्वेक्षण सुरू होतं त्यामुळे हा ड्रोन उडवण्यात आला असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.
या प्रकारानंतर उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी एक्सवरून हा मातोश्री परिसरात ड्रोनचे हवाई उड्डाणाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मातोश्रीवरील सुरक्षा रक्षकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याचा व्हिडिओ शूट केला. त्यामुळे मातोश्री वरील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे दानवे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. मातोश्रीवर टेहाळणी केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. या आरोपांवर मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.
अंबादास दानवे यांची एक्सपोस्ट
The post ‘मातोश्री’वर ड्रोनद्वारे टेहाळली? व्हिडीओमुळे खळबळ, उद्धव ठाकरेंची सुरक्षा धोक्यात? मुंबई पोलिसांनी दिली अपडेट appeared first on Dainik Prabhat.
Source
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.