
Malaika Arora dance | अभिनेत्री मलायका अरोरा हिचा डान्स चर्चेत आला आहे. सध्या ती हनी सिंगसोबत ‘चिलगम’ या म्यूझिक व्हिडिओमध्ये दिसत आहे, ज्याची झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. तिचे ‘चिलगम’ हे नवीन गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मात्र या गाण्यातील मलायकाच्या काही डान्स स्टेप्समुळे तिला ट्रोल केले जात आहे.
गाण्यात काही ठिकाणी मलायका अशा काही स्टेप्स करताना दिसत आहे त्याबद्दल लोक थेट तिला अश्लील म्हणत ट्रोल करत आहेत. या म्यूझिक व्हिडिओ चिलगममध्ये मलायका अरोरा शिमरी ड्रेसमध्ये दिसत आहे. तसेच तिचे डान्स मूव्ह्स पाहायला मिळत आहेत. एका युजरने लिहिले, ‘ती योग्यरित्या करत नाहीये म्हणून हे व्हल्गर वाटत आहे.’ तर ‘मेरे मेहबूब’ या गाण्यात तृप्तीसोबतही असेच घडल्याचं उदाहरणही एका युजरने दिलं आहे. तर काहींनी हा व्हिडिओ डिलिट करण्याची मागणी केली आहे. Malaika Arora dance |
दरम्यान, या टीकेवर हनी सिंग किंवा मलायका अरोरा यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. मलायका अरोरा याआधी छैय्या छैय्या, मुन्नी बदनाम हुई, अनारकली डिस्को चली आणि माही वे यात दिसली होती. तसेच तिला चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले होते. Malaika Arora dance |
हेही वाचा :
The post हनी सिंगसोबतच्या गाण्यातील डान्स स्टेप्समुळे मलायका अरोरा ट्रोल appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











