अभिनेत्री भारती सिंगची ‘ती’ झाली इच्छा पूर्ण! व्हिडीओ व्हायरल, प्रियांकाची मन जिंकणारी कमेंट एकदा वाचाच..

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Bharti Singh : प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेत्री भारती सिंगने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या नवीन घड्याळाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या घड्याळाची किंमत २० लाख रुपये असल्याचे वृत्त आहे. भारती या व्हिडीओमुळे चर्चेत आली असून, अभिनेत्री प्रियांका चोप्राने व्हिडीओवर सुंदर कमेंट केली आहे. या कमेंटची जोरदार चर्चा होत आहे.

अभिनेत्री भारती सिंग सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचे वैयक्तिक आयुष्य असो किंवा मग कामाशी संबंधित बाबी याविषयी ती चाहत्यांना वेळोवेळी अपडेट देत असते. तिने एका मौल्यवान मिळालेल्या भेट वस्तूचा व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे. या व्हिडीओत भारती तिच्या चाहत्यांना तिच्याजवळील मौल्यवान किंमतीचे  घड्याळ दाखवताना दिसत आहे. हे महागडे घड्याळ तिला पती हर्ष लिंबाचिया यांनी भेट म्हणून दिले आहे.

घड्याळ पाहून भारती भावुक झाली आणि तिने हे घड्याळ प्रियांका चोप्राच्या हातावर पाहिल्याची आठवण सांगितली. इंन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओला मित्रांनो, कृपया हा व्लॉग इतका शेअर करा की तो प्रियंकापर्यंत पोहोचेल.” असे आवाहन भारतीने चाहत्यांना केले होते. तसेच  माझ्या काही मित्रांनी मला एक घड्याळ घेण्यास सांगितले आणि शेवटी मी ते विकत घेतले, असे देखील भारतीने सांगितले आहे.

अखेर हा व्हिडीओ प्रियांकापर्यंत पोहचला असून तिने यावर सुंदर कमेंट केली आहे. या व्हिडीओवर “मी पाहत आहे… आणि हे घड्याळ माझ्यापेक्षा तुझ्या हातावर जास्त चांगले दिसते. तू Bvlgari ची पुढची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेस, त्यांना अजून ते माहित नाही. तुला आणि तुझ्या कुटुंबाला खूप खूप प्रेम. ” अशी कमेंट प्रियांकाने व्हिडीओवर केली आहे.

या घड्याळाची किंमत आश्चर्यचकित करणारी आहे. ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटनुसार हे Bvlgari Serpenti Tubogas Double-Spiral घड्याळ १८ कॅरेट सोने आणि स्टेनलेस स्टीलपासून बनवण्यात आले आहे. डायमंड-सेट बेझल आणि हिरव्या सनलाइट डायलसह त्याची किंमत २० लाखांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा : रशियाचा युक्रेनवर क्षेपणास्त्रे अन् ड्रोनने प्राणघातक हल्ला ; अणु तळांना लक्ष्य करत सर्वत्र कहर

The post अभिनेत्री भारती सिंगची ‘ती’ झाली इच्छा पूर्ण! व्हिडीओ व्हायरल, प्रियांकाची मन जिंकणारी कमेंट एकदा वाचाच.. appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!