सुनील शेट्टीची सून होणार मराठमोळी अभिनेत्री? अहानच्या रंगल्या डेटिंगच्या चर्चा

Ahan Shetty |
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

 Ahan Shetty |  अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. ही अभिनेत्री ‘बिग बॉस ओटीटी’ मध्येही सहभागी झालेली आहे. त्याचबरोबर तिनं मराठी सिनेमातही काम केलं आहे. अहान शेट्टीचं नाव ‘वेड’ सिनेमातील जिया शंकरसोबत जोडलं जातंय. त्यामुळे आता मराठी अभिनेत्री सुनील शेट्टीची सून होणार असल्याचं म्हटलं जातंय.

जियाने आतपर्यंत अनेकदा तिचा बॉयफ्रेंड असल्याचं म्हटलं आहे. पण तो नेमका कोण? याबद्दल तिनं काहीच सांगितलेलं नाही. सध्या जियाचा बॉयफ्रेंड अहान शेट्टी असल्याची चर्चा रंगली आहे. पण अद्याप जिया व अहान दोघांनी याबद्दल काही माहिती दिलेली नाही. त्यामुळे या फक्त चर्चा आहेत की त्यात सत्य आहे याबद्दल सांगता येणार नाही.

जिया शंकरने रितेश देशमुखबरोबर ‘वेड’ या मराठी चित्रपटात मुख्य भूमिका केली होती. याशिवाय ती बिग बॉस ओटीटी, मेरी हानिकारक बीवी, पिशाचिनी, काटेलाल अँड सन्स या मालिकांमध्ये दिसली आहे. Ahan Shetty |

अहान शेट्टीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या साजिद नाडियाडवालाच्या ‘तडप’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यात अभिनेत्री तारा सुतारियाने मुख्य भूमिका साकारली होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.

अहान आता सनी देओलच्या आगामी ‘बॉर्डर २’ चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. यात अहानबरोबर वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ आहेत. २३ जानेवारी २०२६ रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.   Ahan Shetty |

हेही वाचा:

“राष्ट्रवादीची अशी औलाद, जी सत्तेशिवाय राहू शकत नाही,” तानाजी सावंतांचा मित्रपक्षावरच हल्लाबोल

The post सुनील शेट्टीची सून होणार मराठमोळी अभिनेत्री? अहानच्या रंगल्या डेटिंगच्या चर्चा appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!