
Russia Ukraine War। गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. दरम्यान, दोन्ही देशांच्या सैन्याने सतत एकमेकांवर हल्ले केले आहेत. शुक्रवारी रात्री ते शनिवार सकाळपर्यंत रशियाने मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, “रशियाच्या हल्ल्यात खमेलनित्स्की आणि रिव्हने या दोन अणुऊर्जा प्रकल्पांना वीजपुरवठा करणाऱ्या सबस्टेशनना लक्ष्य केले गेले”
युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्रेई त्सिबिहा यांनी, “हे हल्ले चुकून झाले नाहीत. रशियाने जाणूनबुजून युरोपमधील अणुसुरक्षा धोक्यात आणली.” असा आरोप केला आहे. या हल्ल्यांमध्ये किमान सात लोक ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. नीपर शहरातील एका निवासी इमारतीवर ड्रोनने हल्ला केल्याने तीन जण ठार झाले, तर झापोरिझ्झियामध्ये तीन आणि खार्किवमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.
पंतप्रधान युलिया स्विरिडेन्को यांनी,”या हल्ल्यांमुळे कीव, पोल्टावा आणि खार्किव प्रदेशातील ऊर्जा पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो घरांना वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला आहे” असे सांगितले. तर पोल्टावा अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते पाणी पुरवण्यासाठी पॉवर जनरेटरवर अवलंबून आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून सरकारी मालकीची ऊर्जा कंपनी, त्सेन्टरेनर्गोने याला सर्वात मोठा हल्ला म्हणून वर्णन केले. कंपनीने म्हटले आहे की शत्रू देशाने त्यांच्या सर्व उत्पादन क्षमतेवर एकाच वेळी हल्ला केला. “आमचे प्लांट आगीत जळत आहेत,” असे त्यात म्हटले आहे. “वीज निर्मिती शून्यावर आली आहे.” त्सेन्टरेनर्गो युक्रेनच्या एकूण विजेच्या अंदाजे ८% उत्पादन करते, त्यामुळे या हल्ल्यांचा राष्ट्रीय पॉवर ग्रिडवर गंभीर परिणाम झाला आहे.
अणु सुरक्षेबद्दल चिंता, IAEA बैठकीची मागणी Russia Ukraine War।
परराष्ट्र मंत्री आंद्रेई त्सिबिहा यांनी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA) च्या गव्हर्नर्स मंडळाची तात्काळ बैठक बोलावण्याची मागणी केली. त्यांनी चीन आणि भारताला असे हल्ले थांबवण्यासाठी रशियावर दबाव आणण्याचे आवाहन केले, ज्यामुळे कधीही विनाशकारी अणु अपघात होऊ शकतो. हे लक्षात घ्यावे की रशियाने यापूर्वी झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पावर गोळीबार केला होता, ज्यामुळे युरोपमध्ये रेडिएशनचा धोका निर्माण झाला होता.
हे प्रत्युत्तरात्मक हल्ले – रशिया Russia Ukraine War।
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, हे हल्ले कीवने रशियाच्या आत केलेल्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून केले आहेत. मंत्रालयाने म्हटले आहे की रशियाने शस्त्रास्त्र उत्पादन सुविधा, वायू आणि ऊर्जा प्रतिष्ठानांवर उच्च-परिशुद्धता, लांब पल्ल्याच्या हवाई, जमीन आणि समुद्री शस्त्रांनी हल्ला केला. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला रशियाच्या ऊर्जा क्षेत्रावर अधिक कठोर निर्बंध लादण्याचे आवाहन केले. झेलेन्स्की यांनी असेही म्हटले आहे की रशियाने फक्त एका रात्रीत ४५० ड्रोन आणि ४५ क्षेपणास्त्रे डागली. युक्रेनियन हवाई दलाने ४०६ ड्रोन आणि ९ क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला आहे, परंतु २६ क्षेपणास्त्रे आणि ५२ ड्रोनने २५ लक्ष्यांवर हल्ला केला.
The post रशियाचा युक्रेनवर क्षेपणास्त्रे अन् ड्रोनने प्राणघातक हल्ला ; अणु तळांना लक्ष्य करत सर्वत्र कहर appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











