पु्ण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरण: शरद पवार यांच्यानंतर रोहित पवार यांची थेट प्रतिक्रिया स्पष्ट शब्दांत म्हणाले…

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Rohit Pawar : राज्यात पुण्यातील पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमिन प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणावर पार्थ यांच्यावर आरोप होत आहेत. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात देखील मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील १८०४ कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली जमिन केवळ ३०० कोटी रुपये देऊन खरेदी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पार्थ पवार संचालिक असलेल्या अमेडिया कंपनीचे नाव या प्रकरणात समोर आले आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही. असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणावर नुकतीच शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत चौकशीची मागणी केली आहे. अशातच आता रोहित पवार यांनी देखील पार्थ पवार जमीन प्रकरणार पहिली प्रतक्रिया दिली आहे.

तुम्ही सरकारमध्ये असो किंवा नको जर चुकीची गोष्ट होत असेल तर कारवाई ही झाली पाहिजे. त्याबाबतची शहानिशा झाली पाहिजे, काय खरे काय खोटे हे लोकांपुढे आले पाहिजे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, आमचे एकच मत आहे की, कुठल्याही नेता असुद्या, नेत्याच्या परिवारातील व्यक्ती असुद्या चूक केली असती तर ती चूकच समजून योग्य पद्धतीची कारवाई ही झाली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. पण ही कारवाई होताना भेदभाव कुठे झाला नाही पाहिजे याचही काळजी घेतली पाहिजे, असे देखील रोहित पवार म्हणाले आहेत.

जमिन प्रकरणावर होणाऱ्या आरोपांनंतर हा जमीन व्यवहार रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.  विरोधकांकडून या प्रकरणात अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. पार्थ पवार यांच्यावर देखील टीका केली जात आहे. या प्रकरणावर अनेक सवाल उपस्थित होते. या जमीन व्यवहाराबद्दल मला कल्पना नाही. मुले मोठी झाली आहेत आणि ते त्यांची व्यवसाय करतात असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : लांब दाढी, काळा चष्मा… ‘धुरंधर’ चित्रपटातील अर्जुन रामपालचा पहिला लूक समोर

The post पु्ण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरण: शरद पवार यांच्यानंतर रोहित पवार यांची थेट प्रतिक्रिया स्पष्ट शब्दांत म्हणाले… appeared first on Dainik Prabhat.

Source

Join Our WhatsApp Group!