लांब दाढी, काळा चष्मा… ‘धुरंधर’ चित्रपटातील अर्जुन रामपालचा पहिला लूक समोर

Dhurandhar Movie |
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Dhurandhar Movie |  अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या बहुप्रतिक्षित ‘धुरंधर’ चित्रपटाचे नवीन पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात अभिनेता अर्जुन रामपालचा पहिला लूक समोर आला आहे. या पोस्टरमध्ये अर्जुन लहान केस, लांब दाढी, काळा चष्मा, अंगठी असा लूकमध्ये दिसत आहे.

‘धुरंधर’ सिनेमातील अर्जुन रामपालचा लूक शेअर करत रणवीर सिंगने कॅप्शनमध्ये, “मौत का फरिश्ता… काउंटडाउन सुरू, फक्त ४ दिवस बाकी,” असे लिहिले आहे. तसेच, चित्रपटाचा ट्रेलर १२ नोव्हेंबरला रिलीज होणार असल्याचेही त्याने सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

या सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले आहे. पाकिस्तानात राहून दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या गुप्तहेराची भूमिका रणवीर सिंहने साकारली आहे. धुरंधर सिनेमा ५ डिसेंबर रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात आर. माधवन, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आला होता, ज्यामध्ये रणवीर सिंगचा दमदार लूक आणि उत्साह पाहण्यासारखा होता. जुलैमध्ये आलेल्या चित्रपटाच्या टीझरमध्ये संपूर्ण स्टारकास्टची झलक दाखवण्यात आली होती. Dhurandhar Movie |

हेही वाचा : 

“स्ट्राँग रूममधील सीसीटीव्ही बंद, मध्यरात्री व्हॅनची एन्ट्री अन् एग्जिट” ; RJD च्या आरोपांवर निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ उत्तर

The post लांब दाढी, काळा चष्मा… ‘धुरंधर’ चित्रपटातील अर्जुन रामपालचा पहिला लूक समोर appeared first on Dainik Prabhat.

Source

Join Our WhatsApp Group!