
प्रभात वृत्तसेवा
पुणे – वारजे माळवाडी पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून दृश्यम ३ चित्रपटाची आठवण करून देणारा एक थरारक खुनाचा गुन्हा उघडकीसआणला आहे. पत्नीच्या प्रेमसंबंधांच्या संशयातून पतीने तिचा गळा दाबून खून केला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी लोखंडी भट्टीत मृतदेह जाळला.ही घटना २६ ऑक्टोबर २०२५ रोजी घडली असून, आरोपी समीर पंजाबराव जाधव (४२, रा. शिवणे, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
त्याने पत्नी अंजली (वय ३८) हिचा खून केल्याची कबुली दिली आहे. समीरचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे, तर अंजली एका खासगी शाळेत शिक्षिका होती.मिसिंगपासून खुनापर्यंतचा तपासपोलिसांनी सांगितले की, २८ ऑक्टोबर रोजी जाधवनेच वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
मात्र त्याचे बोलणे व हालचाली संशयास्पद वाटल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कोईगडे यांनी तपास पुढे सुरू ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक नितीन गायकवाड आणि संजय नरळे यांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि चौकशीतून अनेक विसंगती शोधून काढल्या. शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
थरकाप उडवणारी घटना..
समीर जाधव याने पत्नीचे दुसऱ्या इसमाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेतला होता. या कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. अखेर त्याने पत्नीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिंदेवाडी येथे गोदाम भाड्याने घेतले, लोखंडी बॉक्स तयार करून ठेवला आणि लाकडे व पेट्रोल जमा केले.त्याने पत्नीला २६ ऑक्टोबर रोजी फिरायला घेऊन जाण्याचा बहाणा केला.
तेथे पत्नीचा गळा दाबून खून केला, मृतदेह त्या बॉक्समध्ये टाकून पेट्रोल ओतले आणि जाळून टाकले. त्यानंतर राख नदीत टाकून बॉक्स स्क्रॅपमध्ये विकला.ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कोईगडे यांच्या पथकाने केली. तपासात पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, नितीन गायकवाड, तसेच अंमलदार गणेश कर्चे, शरद पोळ व शिरीष गावडे यांनी सहभाग घेतला. वारजे माळवाडी पोलिसांनी दाखल गुन्हा पुढील तपासासाठी राजगड पोलिसांकडे वर्ग केला आहे.
The post दृश्यम ३ स्टाईल खुनाचा थरार! पत्नीचा खून करून मृतदेह भट्टीत जाळला, पतीनेच दिली होती मिसिंगची तक्रार appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











