धक्कादायक घटना! कामावरून कमी केल्याने व्यक्तीने जीवन संपवले, दोघांवर गुन्हा दाखल

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – कामावरुन कमी केल्याने एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दीपक बोबडे ( ५०, रा. प्रेस्टीज पॅसफिक सोसायटी, दळवीनगर, आंबेगाव, कात्रज) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दीपक बोबडे यांची पत्नी स्वाती ( ४५) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, अजित जाधव, रवींद्र राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, स्वाती बोबडे यांचे पती एका खासगी कंपनीत कामाला होते. आरोपींनी दिलेला त्रास, तसेच त्यांना कामावरुन कमी केल्याने ते नैराश्यात होते. गेल्या महिन्यात ६ ऑक्टोबर रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात असलेल्या एका लाॅजमध्ये दीपक यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यानंतर त्यांची पत्नी स्वाती यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पतीला कामावरुन काढून टाकल्याने ते नैराश्यात होते, तसेच आरोपींच्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी फिर्यादीत केला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

The post धक्कादायक घटना! कामावरून कमी केल्याने व्यक्तीने जीवन संपवले, दोघांवर गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!