‘हे सगळं गौडबंगाल आहे’, अजित पवारांचे पार्थ पवार जमीन खरेदी व्यवहारावर स्पष्टीकरण

Ajit Pawar
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Ajit Pawar News: उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या ‘अमेडीया होल्डिंग्स एलएलपी’ कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याच्या कथित व्यवहारावर आज अजित पवार यांनी सविस्तर भूमिका मांडली.

१,८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन अवघ्या ३०० कोटींमध्ये खरेदी करणे आणि त्यानंतर लगेचच त्यावरचे शुल्क माफ करण्याचे आदेश दिल्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपांमुळे हा व्यवहार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याप्रकरणी उपस्थित झालेल्या प्रश्नांवर अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सविस्तर उत्तर दिले.

“या प्रकरणात एकही रुपया गुंतवलेला नाही” 
पार्थ पवार यांनी ३०० कोटी रुपयांचा इतका मोठा व्यवहार करताना वडील म्हणून तुम्हाला विचारले नाही का, किंवा याची कल्पना दिली नाही का, या प्रश्नावर अजित पवार यांनी उत्तर दिले,  “अरे मुळात पैसेच गुंतवलेले नाहीत. एक रुपया देखील गुंतवलेला नाही. मी ते सगळं बघितलं, व्यवहार पाहिला, अरे ३०० कोटी रुपये कशाला म्हणतात? एवढी मोठी रक्कम? मला एक गोष्ट कळत नाही की समोरच्या पार्टीने देखील एक रुपया न घेता कसा काय हा व्यावहार केला. हे सगळं गौडबंगाल आहे,” असे अजित पवार म्हणाले.

हा व्यवहार सरकारी नियमांना धाब्यावर बसवून झाल्याचा विरोधी पक्षांचा आरोप आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून, चौकशी करत आहेत.

अजित पवार पुढे म्हणाले, “या प्रकरणात कोण फसलं, प्रश्न विचारणारा फसला, खरेदी करणारा की विकणारा ते तपासत आहोत. चौकशी केल्याशिवाय आपल्याला सत्य कळणार नाही. हे कोणी केलं? यात कोण अधिकारी होते? चौकशीचा अहवाल आला की मी अशीच पत्रकार परिषद घेऊन तुम्हा सर्वाना माहिती देईन.”

या वादग्रस्त जमीन खरेदी व्यवहारामध्ये आपला कोणताही आर्थिक सहभाग नसून, पूर्ण प्रकरणाची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली आहे. चौकशी अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

The post ‘हे सगळं गौडबंगाल आहे’, अजित पवारांचे पार्थ पवार जमीन खरेदी व्यवहारावर स्पष्टीकरण appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!