
प्रभात वृत्तसेवा
पुणे – महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेच्या आरक्षणाची सोडत जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. पक्षातर्फे उपलब्ध करून दिलेले सर्व अर्ज पहिल्याच दिवशी संपले असून, तब्बल ३०० इच्छुकांनी अर्ज घेतल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. आणखी इच्छुकांसाठी अतिरिक्त अर्ज पक्ष कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
अनेक प्रभागांमध्ये आरक्षण सोयीचे पडल्याने इच्छुकांना संधी निर्माण झाली आहे. त्यातच शहरात महाविकास आघाडीतून भाजपला रोखण्यासाठी लढाई लढण्याचा पक्षाचा निर्णय असल्याने उमेदवारांमध्ये उत्साह वाढल्याचे पक्षातील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या मागील निवडणुका २०१७ मध्ये झाल्या होत्या. मार्च २०२२ मध्ये निवडणुका होणे अपेक्षित होते.
मात्र, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने त्या पुढे ढकलल्या. आता न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना निश्चित केली. दोन दिवसांपूर्वी आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे प्रभागांची स्थिती आणि ताकद स्पष्ट झाली आहे.
पक्षफुटीनंतर कार्यकर्त्यांत उत्साह..
२०१७ मधील महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना पक्षाचे ४२ नगरसेवक निवडून आले होते. त्या वेळी मोदी लाटेमुळे भाजपचे ९८ नगरसेवक निवडून आले आणि मनसे व काँग्रेसला मोठा फटका बसला होता. मनसेचे नगरसेवक २८ वरून २ वर, तर काँग्रेसचे नगरसेवक २७ वरून १० वर आले. मात्र, राष्ट्रवादीला केवळ ८ ते १० जागांचा फटका बसला होता. त्यानंतर राज्यातील सत्ता समीकरण बदलले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव अजित पवारांकडे, तर दुसऱ्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे नाव मिळाले. ४४ पैकी ३८ हून अधिक नगरसेवक अजित पवारांच्या पक्षात गेल्याने शरद पवार पक्षात दुसऱ्या फळीतील अनेक कार्यकर्त्यांना संधी निर्माण झाली. त्यामुळे या पक्षातून निवडणूक लढण्यास इच्छुकांची संख्या वाढल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
The post PMC Election : राष्ट्रवादी शरद पवार पक्षात उमेदवारीसाठी महापूर; पहिल्याच दिवशी ३०० अर्ज संपले appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











