PM Modi On Delhi Blast : दिल्ली स्फोटावर पंतप्रधान मोदींची भूतानमधून पहिली प्रतिक्रिया, थेट इशारा देताना म्हणाले की…

PM Modi On Delhi Blast : दिल्ली स्फोटावर पंतप्रधान मोदींची भूतानमधून पहिली प्रतिक्रिया, थेट इशारा देताना म्हणाले की…
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

दिल्लीत काल झालेल्या स्फोटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया आली आहे. दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी 6:52 च्या सुमारास शक्तीशाली कार स्फोट झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात आहे. ते भूतान दौऱ्यावर आहेत. तिथे एका जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली स्फोटावर आपली भूमिका मांडली. आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच मोदी म्हणाले की, आज मी इथे जड अंतकरणाने आलोय. काल संध्याकाळी दिल्लीत झालेल्या भयावह घटनेने सर्वांच मन व्यथित झालय. या स्फोटामागे जे आहेत, ज्यांनी हे षडयंत्र रचलं त्यांना सोडणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

(बातमी अपडेट होत आहे)

 

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!