
प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – गोळीबार करून खून करून पळून गेलेल्या दोघा आरोपींचा ताम्हिणी घाट परिसरात फिल्मी स्टाइल पाठलाग करून त्यांना अटक केली. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या काळ्या रंगाच्या फॉर्च्यूनर कारही ताब्यात घेतली. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कामगिरी केली.विक्रांत सुरेश ठाकूर (वय 38, रा. माळवाडी, सोळू, ता. खेड, जि. पुणे) आणि सुमित फुलचंद पटेल (वय 31, रा. पसायदान कॉलनी, गायकवाड नगर, दिघी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताम्हिणी घाट परिसरात आरोपींचा शोध घेत असताना विना नंबर प्लेटची एक संशयित काळ्या रंगाची फॉर्च्यूनर गाडी पौडकडे जाताना दिसली. पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरू करत वेढा दिला. आरोपी गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पथकाने आवश्यक तेवढा बळाचा वापर करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली काळी फॉर्च्यूनर (MH 14 LL 8900) आणि विवो कंपनीचा मोबाइल असा एकूण 35 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
आरोपींना दिघी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अतिरिक्त कार्यभार (अपर आयुक्त) श्वेता खेडकर, उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार व सहायक आयुक्त प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील उपनिरीक्षक सुनिल भदाणे, अमर राऊत, सहायक उपनिरीक्षक सुनिल कानगुडे, रमेश गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
The post Pimpri Crime : ताम्हिणी घाटात थरार! गोळीबार करून पळालेल्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











